महाबी फाऊंडेशनतर्फे महाबी समर कॅम्पचे आयोजन
महाबळेश्वर- येथील महाबी फाऊंडेशनच्यावतीने दि. ५ मे ते २५ मे २०२४ या दरम्यान महाबी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात नृत्य प्रशिक्षण शिबीर, ढोल-ताशा प्रशिक्षण शिबीर, चित्रकला प्रशिक्षण शिबीर, पोस्टर रांगोळी प्रशिक्षण व प्रदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे. हा कॅम्प जन्नीमाता मंदिर (मम्हादेवी मंदिर, महाबळेश्वर) येथे होणार आहे.
कॅम्पसाठी ३ ते १२ वर्ष मुले व मुली, १२ वर्षावरील खुला गट मुले व मुली, महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच हे वयोगट आहेत. पहिल्या दिवशी सर्व महाबळेश्वरवासियांसाठी मोफत प्रात्याक्षिक शिबीर व एक्वा झुंबाचे स्पेशल नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कलेसाठी यशस्वी व तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या कॅम्पमध्ये मयुरेश सुर्यवंशी, शिवप्रताप ढोल ताशा पथक, प्रमोद शिंदे, वैशाली चौरसिया हे मार्गदर्शन करणार आहेत. सर्व मुली, महिलांसाठी मोफत सेल्फ मेकअप व डेली स्क्रीनकेअर रुटीनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेश फी प्रत्येक कलेसाठी ६५० रुपये आहे. कॅम्पमध्ये
सहभागी होण्यासाठी ॲड.प्रदीप मोरे, ॲड. रेणुका ओंबाळे(मोरे), वैशाली परदेशी चौरसिया, सुनिल बिरामणे, संतोष मांजलकर, विनायक साळवी, अंकुश शिंदे यांच्यासाठी संपर्क साधावा.