महाभकास आघाडीला घरी बसवा- श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
काँग्रेसच्या काळात लोकांना दोन वेळेचं अन्नही मिळत नव्हतं. अनेकांना डोक्यावर छप्परही नव्हतं. त्यांनीच आता महाविकास आघाडी तयार करून निवडणूक लढवत आहेत, अशा महाभकास आघाडीला घरी बसवा.
देशाला महासत्तेच्या दिशेने नेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगांनी मान्य केले असून त्यांना साथ देणे आपले कर्तव्य आहे.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघ महिला मेळावा आज हमजाबाद फाटा वृंदावन हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींनी महायुती उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, माजी नगराध्यक्ष रंजनाताई रावत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेश्माताई शिंदे, अनिता चोरगे, संगीता ननावरे, सीमा जाधव सुरेखा गायकवाड, संदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती.