Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं! आता फोरव्हीलर असणाऱ्यांची घरोघरी जाऊन होणार तपासणी

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं! आता फोरव्हीलर  असणाऱ्यांची घरोघरी जाऊन होणार तपासणी 

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं! आता फोरव्हीलर  असणाऱ्यांची घरोघरी जाऊन होणार तपासणी 

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार आहे. जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे त्या महिला आता अपात्र होणार आहे. या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवीन मोहिम राबवली आबे. आता पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तुमच्या दरवाजात उभी राहणार आहे. तुमच्या घरी येऊन पडताळणी केली जाणार आहे. जर त्यामध्ये तुमच्याकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळले तर तुम्हाला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी सोमवारी बैठक घेऊम राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणींच्या’ घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याच आली आहे. त्यामुळे चारचाकी कोणत्या घरात आहे याची माहिती मिळेल. यामुळे पडताळणीचे काम सोपे होणार आहे.

महिलांचे वय हे २१ ते ६५ वयोगटातील असावे. महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा की असावे. महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे. तसेच महिला कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नसावी. जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

माऊली, माऊली” गजरात महाबळेश्वरच्या गिरिस्थान प्रशालेत बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात

Post Views: 22 माऊली, माऊली” गजरात महाबळेश्वरच्या गिरिस्थान प्रशालेत बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात महाबळेश्वर: “माऊली! माऊली!” च्या जयघोषात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि

Live Cricket