Home » सहकार » किसन वीर-खंडाळ्या’चे नोव्हेंबरअखेरचे ११ कोटी ९१ लाख ऊस बील जमा

किसन वीर-खंडाळ्या’चे नोव्हेंबरअखेरचे ११ कोटी ९१ लाख ऊस बील जमा

किसन वीर-खंडाळ्या’चे नोव्हेंबरअखेरचे ११ कोटी ९१ लाख ऊस बील जमा

किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊस बीलाची रक्कम प्रति मेट्रिक टन ३ हजार रुपयांप्रमाणे ११ कोटी ९१ लाख ८० हजार ५२३ रूपये संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

माहितीपत्रकात पुढे म्हटले आहे की, यापुर्वी ३१ मार्चपर्यंत सोसायटी व्याजापोटी ३० कोटी व्याजाची रक्कम जमा केली होती. कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी शेतकऱ्यांना हितासाठीच दोन्ही कारखाने ताब्यात घेतले व गाळप यशस्वी करून दाखविले. चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी शब्द दिल्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रुपये दर दिलेला असुन बीलही जमा करण्यात आले आहे. उर्वरित पंधरवड्याची बीलेही लवकरच जमा करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. सध्या किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच कोणतीही बॅंक कर्ज देत नसल्याने व आपल्याला फक्त साखर विक्रीपोटीच पैसे उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे आपल्या बीलांना उशीर झाला आहे. परंतु सभासदांनीही ज्यापद्धतीने आमच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही आपले आभारी असल्याचेही यावेळी श्री. शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

संत रोहिदास समाज फाऊंडेशनतर्फे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाबळेश्वरमध्ये भव्य गौरव सोहळा संपन्न

Post Views: 15 संत रोहिदास समाज फाऊंडेशनतर्फे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाबळेश्वरमध्ये भव्य गौरव सोहळा संपन्न महाबळेश्वर-सातारा आणि रायगड जिल्ह्यातील संत

Live Cricket