Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » किसन वीर व खंडाळा कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ बुधवारी

किसन वीर व खंडाळा कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ बुधवारी

किसन वीर व खंडाळा कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ बुधवारी

दि. ११/११/२४ : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार (दि. १३) रोजी होणार आहे. खंडाळा कारखान्याचा सकाळी १० वाजता तर किसन वीर कारखान्याचा दुपारी १ वाजता कार्यक्षेत्रातील पाच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, शासनाने राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्याबाबत सुचित केलेले होते. किसन वीर व खंडाळा कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे पुर्ण झालेली असून कारखाना गळितासाठी सज्ज झालेला आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यावर ऊस तोडणी मजुरही दाखल झालेले आहेत. मागील दोन हंगाम आपण यशस्वीरित्या चालवुन शेतकरी व वाहन मालकांचे संपुर्ण पेमेंट अदा केल्यामुळे तसेच मागील संचालक मंडळाच्या काळातील सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बील ५४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यामुळे कारखान्यावर विश्वास वाढलेला आहे. किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्याचे आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ संचालक मंडळाने डोळ्यासमोर ठेवलेले आहे. हा गळीत हंगाम शेतकरी व कामगारांच्या सांघिक प्रयत्नातुन यशस्वी करणार आहोत. या गळित हंगामातही एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम आपण देणार असून सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी कोणत्याची भुलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच गाळपासाठी देण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केलेले आहे.

किसन वीर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 125 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket