शाश्वत विकास आणि लोक कल्याणकारी योजनांसाठी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे मंत्री होणे आवश्यक: प्रा. दशरथ सगरे
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीला घवघवीत यश हे दोन्ही राजांच्या सक्षम नेतृत्वाच्या प्रभावामुळे
सातारा -छत्रपती शिवेंद्रसिंह राजेंच्या रूपाने सातारा जावळी मतदार संघाला एक व्यापक आणि शाश्वत विकासाला अनुसरून काम करणारे लोक नेतृत्व प्राप्त झाले आहे. शिवेंद्रसिंह राजांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच सातारा, महाराष्ट्र राज्यातील प्रगत तालुक्यांपैकी एक महत्त्वाचा तालुका आहे. राज्याच्या सकारात्मक बदलांसाठी शिवेंद्रसिंह राजेंना मंत्रिपद मिळणे आवश्यक असल्याची मनोकामना यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केली. त्यांच्या सक्षम आणि सामर्थ्यपूर्ण नेतृत्वामुळेच सातारा चे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाचे महत्त्व शीर्षस्थानी अधोरेखित होताना महाराष्ट्र पाहतो आहे, असेही ते म्हणाले.
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीला विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेले घवघवीत यश हे दोन्ही राज्यांच्या सक्षम नेतृत्वाच्या प्रभावामुळे मिळाले असल्याचे देखील ते म्हणाले.
लोकप्रतिनिधीचे रयतेसाठी असणारे समर्पण आणि आपले सामान्यप्रती असणारे योगदान हे न बदलता येणारे आहे. राजकीय सामाजिक, क्षेत्रातील आपलं कार्य पुढे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी शिवेंद्र सिंहराजेंचे कार्य हे मोलाचे ठरणारे आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदारांपैकी एक असलेले छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. छत्रपती अभयसिंह राजेंचा वैचारिक आणि सामाजिक वारसा अखंडपणे पुढे नेणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहना मंत्रीपद मिळणे आवश्यक असल्याचे प्रा. सगरे म्हणाले.
साताऱ्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे आवर्जून लक्ष देणारे लोकप्रतिनिधी हेच सर्वसामान्य कुटुंबातील युवक युवतींना अधिक कार्यक्षम, आणि समाजाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सक्षम बनवू शकतात. भविष्यकाळातील साताऱ्यातील औद्योगिक विकास, आयटी पार्क अशा अत्यंत महत्त्वाच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येय धोरणांसाठी हे मंत्रीपद महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास वाटतो.
![sataranewsmediasevan](https://secure.gravatar.com/avatar/33c7a0681fc3ac14e8f42ffbc90d7faa?s=96&r=g&d=https://sataranewsmediasevan.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)