Home » राज्य » शिक्षण » श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.

श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.

सातारा: श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.

योग दिनाच्या कार्यक्रमासाठी हिंदवी पंचकोषाधारीत गुरुकुलच्या कार्यकारी संचलिका रमणी कुलकर्णी उपस्थित होत्या. त्याचबरोबर योग आसनांचे मार्गदर्शन करण्यासाठी योग शिक्षक अध्यक्षा मदन आढाव यांनी मनोगताच्या माध्यमातून योग दिनाचे महत्त्व पटवून देत त्यामागे असलेली सुदृढ आरोग्य आणि सुदृढ मन याबाबतची संकल्पना विद्यार्थिनींना समजावून सांगितली. श्रीमती कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तन आणि मनाची एकाग्रता करून आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करणे हाच योग दिनाचा उद्देश असून शरीर बळकट होण्यासाठी योग दिनाचे असलेले महत्त्व विशद केले. मुख्याध्यापिका मंजुषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, क्रीडा शिक्षक विनोद दाबाडे, गौरव माने आदी उपस्थित होते. या सोबतच शाळेतील विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षकांनी विविध योग्य प्रात्यक्षिके सादर करून रोज योगा करण्याचा संकल्प केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

माऊली, माऊली” गजरात महाबळेश्वरच्या गिरिस्थान प्रशालेत बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात

Post Views: 30 माऊली, माऊली” गजरात महाबळेश्वरच्या गिरिस्थान प्रशालेत बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात महाबळेश्वर: “माऊली! माऊली!” च्या जयघोषात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि

Live Cricket