गौरीशंकर फार्मसीमध्ये बौद्धिक संपदा हक्क कार्यशाळा संपन्न
100 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, सहभागी विद्यार्थाना प्रमाणपत्र वाटप, पेटंट हक्क विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ
लिंब – उच्चशिक्षणाच्या ज्ञानाच्या आधारे केलेले नविन्यपूर्ण संगोधनाचे हक्क विशिष्ट कालवधीसाठी संरक्षण करण्यासाठी जो मूलभूत अधिकार प्राप्त झाला आहे याविषयाची कायदेशीर माहितीचे प्रबोधन करण्यासाठी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल ऐज्युकेशन अँड रिसर्च, लिंब महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क ( आय.पी.आर अॅन्ङ रेग्युलेटरी अफैर) ही सहा दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
मानवी जीवनाची बदलती जीवनशैली मुळे निर्माण होणारे विविध आजार व त्यावर परिणामकारक उपचार पद्धती विषयी व स्वःता केलेले संशोधन बाबतचे हक्क प्राप्त झालेले असता ते इतराना विशिष्ट कालवधीत वापरत येत नाही. याबाबतचे प्रबोधन व मार्गदर्शन या कार्यशाळेत विद्यार्थाना करण्यात आले .
यावेळ संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ योगेश गुरव, यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपञ वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यशाळेचे समन्वयक डॉ संतोष बेल्हेकर, ङाॅ.भूषण पवार, ङाँ.धैर्यशील घाडगे, प्रबंधक निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
सहा दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी औषध निर्माण शास्त्र शाखेतील नाविन्यपूर्ण संशोधनाची निवड कशा प्रकारे करावी तसेच औषध निर्माण शास्त्र शाखेतील जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडी व त्यामधील करिअरची संधी याबाबत विद्यार्थ्याना राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ डॉ.महेश जाधव, डॉ.प्रवीण बुगे, सचिन गुंदेजा,अमित कुंभार, प्रमोद बोरकर, केदार मोरे या तज्ञांनी मार्गदर्शन केले .
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की गुणवत्ता कौशल्य व व्यवहार ज्ञानाची जीवनात सांगड घालता आली पाहिजे तसेच उज्वल करिअरसाठी आवश्यक बाबीकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले की औषध निर्माण शास्त्राचे ज्ञान घेताना केवळ नोकरी व्यवसाय ही उद्दिष्टे विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर न ठेवता समाजाला उपयुक्त ठरणारे नाविन्यपूर्ण संशोधनाचा ध्यास घेऊन वाटचाल करावी
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा .रोहन खुटाळे, प्रा. कीर्ती माने, प्रा .गौरी इथापे, प्रा.दुधेश्वर क्षीरसागर, प्रा. स्वप्नाली झोरे यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नूतन गवांदे हीने केले.
स्वःता केलेले संशोधनाचा वापर अन्य कोणी करू नये यासाठीचे कायदेशीर मूलभूत अधिकार बाबतची माहिती घेणे गरजेचे असून यासाठी विविध स्तरावर होत असलेल्या कार्यशाळेमधून तज्ञांचे मिळणारे मार्गदर्शन लाभदायक ठरते पेटंट ट्रेडमार्क कॉफी राईट सुरक्षित बाबत प्रत्येकाने जागरूक असायला हवे याबाबत या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
