Home » राजकारण » मेढा शहरात फक्त उदयनराजेंच घरोघरी जाऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले प्रचार पत्रकाचे वाटप

मेढा शहरात फक्त उदयनराजेंच घरोघरी जाऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले प्रचार पत्रकाचे वाटप

मेढा शहरात फक्त उदयनराजेंच घरोघरी जाऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले प्रचार पत्रकाचे वाटप

मेढा प्रतिनिधी :  सातारा लोकसभेचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मेढा शहरातून पदयात्रा काढून प्रचार पत्रकाचे वाटप केले

मेढा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीआणि सौंदर्य वाढवण्यासाठी जावली तालुक्याचे भाग्यविधाते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भरघोस निधी टाकला आहे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून मेढा शहरात कोट्यावधींची विकास कामे झाली असून ही विकास कामे पाहून पाहून आम्ही बाबाराजे सांगतील तेच करणार आणि महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी होण्यासाठी मेढा शहरातून मताधिक्य देणार असल्याचे यावेळी अनेक मतदारांनी सांगितले

यावेळी कार्यकर्त्यांनी मेढा शहर बाजारपेठ देशमुख आळी,चांदणी चौक लोकमान्य टिळक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक कुंभारवाडा आदी विभागात घरोघरी जाऊन प्रचार पत्रकाचे वाटप केले व आपल्या देशाला आणि राज्याला प्रगतीच्या दिशेवर घेऊन जाण्यासाठी मोदी सरकार पुन्हा एकदा यावे त्यासाठी आपल्याला श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना मतदान करणे गरजेचे असल्याचे मतदारांना कार्यकर्त्यांनी पटवून दिले व आपले अमूल्य मत वाया घालवू नका असे मतदारांना ठणकावून सांगितले.

या प्रचार रॅलीत माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, माजी उपसभापती कांतीबाई देशमुख, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे,माजी सरपंच डॉ संपतराव कांबळे,नगरसेवक शशिकांत गुरव,विकास देशपांडे,नारायण देशमुख,रामभाऊ सावंत,शिवाजीराव गोरे,बाळू आगाशे, विनोद वेंदे,रोहित देशमुख शंकर देशमुख,संजय सपकाळ,दत्तात्रय वारागडे, सुशांत कांबळे,प्रकाश अवघडे, संतोष करंजेकर,सुमित सपकाळ,दादा कोडुलकर, बाबू देशमुख, श्रीकांत पवार, सुरेश जंगम, बाळा घोडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )-हिंदू बहुजन सन्मान

Live Cricket