Home » राज्य » रुग्णालयातून डायरेक्ट मतदान केंद्रावर

रुग्णालयातून डायरेक्ट मतदान केंद्रावर 

रुग्णालयातून डायरेक्ट मतदान केंद्रावर 

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )सातारा येथील सौ. रूपाली नितीन भोसले ह्या अल्पशा आजारामुळे गेले आठ दिवस साताऱ्यातीलच एका खासगी रुग्णालयात ऍडमिट होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांनी त्यांचे पती व अजिंक्यतारा कारखान्याचे माजी कामगार संचालक नितीन भोसले यांच्याकडे आज मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्याचा हट्ट धरला. नितीन भोसले यांनी त्यांना व्हील चेअरवर बसवून वाहनातून हत्तीखाना शाळा येथील मतदान केंद्रावर आणले. तेथे सौ. रूपाली भोसले यांनी आजारपणात आपल्या मतदानाचे कर्तव्य तर बजावलेच मात्र कोणत्याही परिस्थितीत सर्वानी आपल्या मतदानाचा हक्क बाजवावा असा मोलाचा संदेशही दिला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket