हिंदवी स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
सातारा, ता. १३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत हिंदवी पब्लिक स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून, हिंदवीच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत बाजी मारली आहे.

हिंदवी स्कूलने याहीवर्षी १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षीही अखंड ठेवली आहे. या परीक्षेत ५५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४१ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये श्रीया यशोधन काजरेकर, ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम, विश्वजीत प्रकाश कदम ९५.८० टक्के गुण मिळवून द्वितीय, अवधूत रमेश सावंत ९३.८० टक्के गुण मिळवून तृतीय, स्नेहा विजयकुमार जाधव ९३ टक्के गुण मिळवून चौथा व समिहन अमित कुलकर्णी याने ९२.८० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, पंचाकोशाधारित गुरुकुलच्या संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका मंजूषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील व शिक्षकांनी अभिनंदन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या रामेश्वरी यादव, ज्योती काटकर, रत्नप्रभा पवार, गौरी देशपांडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना अमित कुलकर्णी म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या इतर उपक्रमाबरोबर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा विद्यार्थी उज्ज्वल कामगिरी करत आहेत. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण यशस्वी होण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व देण्यास संस्था कटिबद्ध आहे.’’




