Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » कर्तुत्ववान महिला प्रकाशक सुनिताराजे पवार यांचा “संस्कृती” हा दिवाळी अंक उत्तम झाला आहे : विनोद कुलकर्णी

कर्तुत्ववान महिला प्रकाशक सुनिताराजे पवार यांचा “संस्कृती” हा दिवाळी अंक उत्तम झाला आहे : विनोद कुलकर्णी

कर्तुत्ववान महिला प्रकाशक सुनिताराजे पवार यांचा “संस्कृती” हा दिवाळी अंक उत्तम झाला आहे : विनोद कुलकर्णी

   सातारा दि. 2 ( प्रतिनिधी) कर्तुत्ववान महिला प्रकाशक सुनिताराजे पवार यांनी काढलेला “संस्कृती” दिवाळी अंक उत्तम झाला आहे .

असे प्रतिपादन विनोद कुलकर्णी यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आयोजित मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळाली त्या निमित्ताने भाषा या विषयावर संस्कृती प्रकाशनाच्या सुनिताराजे पवार यांनी संपादन केलेल्या “संस्कृती” या मराठी दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना केले.  

  सदर कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक ,डॉ.राजेंद्र माने,ज्येष्ठ पत्रकार व लेखक श्रीकांत कात्रे , संगीत तज्ञ अनिल वाळिंबे, पर्यावरण रक्षक व लेखक ,वक्त्या संध्या चौगुले,कार्यवाह म.सा.प. पुणे शिरीष चिटणीस, व्यवस्थापक विनायक भोसले, उपव्यवस्थापक व शाखाधिकारी रवींद्र कळसकर मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विनोद कुलकर्णी यांनी संस्कृती प्रकाशनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले आहे असे जाहीर केले.   

     यानंतर विनोद कुलकर्णी पुढे म्हणाले सुनिताराजे पवार या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या लेखिका , प्रकाशक आहेत त्यांनी आपले शिक्षण अतिशय संघर्ष करून पूर्ण केले.

 त्यांनी सातारा जिल्ह्यातून पुण्यात जायचे पुण्यात जाऊन एक प्रकाशक संस्था उत्तमरीत्या चालवायची हे इतके सोपे काम नाही ते काम त्या लीलया पार पाडतात ही महत्त्वाची बाब आहे.

पुणेकर तुम्हाला सहजासहजी स्वीकारत नाहीत तुम्हाला खड्यासारखे बाजूला काढतात अशा वेळेस पुण्यासारख्या शहरात टिकून राहणे त्यासाठी त्यांनी अतिशय संघर्ष केला आहे.

     पुण्यामध्ये साहित्य परिषदेत काम करत असताना कार्यवाह, कोषाध्यक्ष ,प्रमुख कार्यवाह यासारख्या पदावर त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असणारे अनेक लेखक लेखिका यांना प्रकाशात आणणारे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.. त्यांनी संस्कृती प्रकाशन तर्फे प्रकाशित केलेला यंदाचा दिवाळी अंक हा खूप छान उत्तम असून या दिवाळी अंकाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. व त्यामध्ये सातत्य ही आहे.

दिवाळी अंक काढणे व प्रकाशित करणे व प्रकाशित झालेला हा अंक संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणे ही सोपी गोष्ट नाही. या दिवाळी अंकामध्ये डॉ. राजेंद्र माने, शिरीष चिटणीस, तसेच माझेही लेख यामध्ये आहेत.

      या दिवाळी अंकाचा लाभ सर्व वाचकांनी घ्यावा असे त्यांनी या या कार्यक्रमाच्या वेळी आवाहन केले व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शिरीष चिटणीस म्हणाले सुनिता राजे पवार ह्या आपल्या वेगवेगळ्या लेखातून प्रकाशनातून सातारकरांना दिवाळी अंक देत असतात . ग्रामीण तसेच सातार मधील चांगले लेखक हुडकून त्यांची प्रतिभा वाढवतात . पुण्यामध्ये त्यांच्या संस्कृती या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच झाले असून आज साताऱ्यात या प्रकाशन कार्यक्रमास विनोद कुलकर्णी , डॉ. राजेंद्र माने श्रीकांत कात्रे ,संध्या चौगुले अनिल वाळिंबे यासारखी मंडळी उपस्थित आहेत ही महत्त्वपूर्ण बाब आहे .

     यापुढे ते म्हणाले शंभर वर्षे झालेल्या संस्थांचे येणाऱ्या कालावधीमध्ये नियोजन करून त्या आठवणी जपणे त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे कार्य असून यातून पुढच्या पिढीला कळेल हे सुख कोणामुळे मिळाले. त्यासाठी हे सर्व संचित लिखित स्वरूपात असले पाहिजे. तसेच त्याचे वाचन पुढील पिढीने केले पाहिजे.

 यावेळी संस्कृती प्रकाशनच्या दिवाळी अंकामध्ये “छोट्या व्यक्तीची मोठी गोष्ट “यावर जाहिरात व लेख आहे. तसेच सातार मधील अनेक लेखकांचे लेख वाचायला मिळतात. या प्रकाशन संस्थेमध्ये मराठी भाषा संदर्भात एक स्वतंत्र विभाग आहे.

     मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा लेख सुद्धा या दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित करण्यात आलेला असल्यामुळे याला एक विशेष वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

तसेच येणारे कालावधीमध्ये आपण एक त्रैमासिक काढणार आहोत हो या मासिकाची जबाबदारी श्रीकांत कात्रे विनोद कुलकर्णी यांचे असेल असे म्हणाले.

 डॉ. राजेंद्र माने म्हणाले दिवाळी अंक हे प्रत्येक मराठी माणसाला आवडणारे एक क्षेत्र आहे .मराठी संस्कृती आणि भाषेचे लेणे म्हणून दिवाळी अंकाकडे बघितले जाते. 

     १२५ वर्षापूर्वी मनोरंजनासाठी काढलेला दिवाळी अंक प्रथम बंगाली व नंतर मराठी या भाषेत चालू झाले. मराठी भाषेप्रमाणे बंगाली भाषेत काही अंक निघाले पण त्याचे सातत्य राहिले नाही. परंतु मराठी भाषेमध्ये असलेला दिवाळी अंक आज 125 वर्षे झाले तरी टिकून आहे.

      या वेळेचा संस्कृती प्रकाशन यांनी काढलेल्या संस्कृती दिवाळी अंकामध्ये सातार मधील अनेक लेखकांचे लेख असून ग्रामीण भागातील लेखकांच्या लेखावर प्रकाश टाकण्याचे प्रभावी काम केले आहे .सध्याचे दिवाळी अंक हे काळानुरूप बदलत असून त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे,

        संध्या चौगुले म्हणाल्या सुनिता राजे पवार ह्या ज्या शाळेत शिकल्या तिथे मी मुख्याध्यापक म्हणून काम केले असून त्या माझ्या विद्यार्थिनी होत्या. वाचन या क्षेत्रात आपल्या शाळेतील विद्यार्थी किती मोठे पद गाठू शकतात याच्या त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत.

      शाळेमध्ये अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली असून त्यांनी वाचन क्षेत्राकडे विद्यार्थी कसे वळवावे यासाठी अनेक गोष्टी सुचवल्या त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ सुरू झाली तसेच ती कशी वाढावी यासाठी सुद्धा सुनिता राजे पवार व माझी नेहमी चर्चा होत असत विचारांचे आदान प्रदान होतं सुनिता राजे पवार यांनी सुचवलेल्या काही बाबीमुळे मुलांच्या वाचनात खूप सुधारणा झाल्या. असे त्यांनी आवर्जून सांगितले

   श्रीकांत कात्रे म्हणाले दिवाळी अंक ही महाराष्ट्राची परंपरा ती प्रत्येक माणसाने जपली पाहिजे. या संस्कृती दिवाळी अंकामध्ये शिरीष चिटणीस डॉ. राजेंद्र माने विनोद कुलकर्णी यांचे लेख असून आपल्या भागातील अनेक लेखकांचे सुद्धा अप्रतिम लेख आहेत त्यामुळे या दिवाळी अंकावर सातारच्या लेखकांचा खूप प्रभाव आहे. ज्या ज्या वेळेस संस्कृती प्रकाशन अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करून नवनवीन दिवाळी अंक काढेल तेव्हा सातारची मदत ही त्यांना नक्कीच राहील अशी आश्वासन दिले.

. अनिल वाळिंबे म्हणाले सुनिता राजे पवार यांनी संस्कृती दिवाळी अंक हा काढला असून या दिवाळी अंकामध्ये सातारा मधील अनेक विचारवंतांचे लेख असून उपयुक्त अशी माहिती सुद्धा आहे .या दिवाळी अंकामध्ये वाचकांच्या आवडीचे साहित्य वाचवण्यास मिळते. तसेच सदरचा दिवाळी अंक प्रत्येकाने आवर्जून वाचला पाहिजे असे म्हणाले.

         वि. ना .लांडगे म्हणाले लेख लिहिताना विराम चिन्हांचा तसेच व्याकरणाचा उपयोग या महत्त्वाच्या गोष्टी आहेत , त्या प्रत्येकाने जपले पाहिजेत यावेळी 43 वर्षांपूर्वी देशपांडे यांनी सुरू केलेल्या त्रैमासिक मासिका बद्दल याबद्दल बोलताना म्हणाले की सातार मध्ये घडलेल्या विशिष्ट घटनांची भाषणांची तसेच विविध कार्यक्रमांची या मासिकेमध्ये नोंद असते व सदरचे हे संचित महाराष्ट्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही अविरत करत आहोत.  संस्कृती प्रकाशनच्या “संस्कृती “या दिवाळी अंकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले असून विनायक भोसले यांनी सूत्रसंचालन केले व रवींद्र कळसकर यांनी आभार मानल

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 7 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket