एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड येथील चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय पास आणि इतर एसटी महामंडळ योजनांबद्दल माहिती देण्यात आली.
आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आगार लेखाकार महेश शिंदे, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी निकम, शिक्षक निलेश होमकर, अनिल कांबळे, यशवंत केंडे, संतोष बावळेकर, दिलीप बावळेकर आणि दत्तात्रय बावळेकर उपस्थित होते.
एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेवार यांनी यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय पास शाळेत जाऊनच देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, आगार व्यवस्थापक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महेश शिंदे आणि किरण धुमाळ यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून एसटी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली.
ग्रीन व्हॅली हॉटेल मेटगुताडचे संचालक संदीप बाबर यांनी पासासाठी आवश्यक असलेले फॉर्म आणि ओळखपत्रांची रक्कम दिली. आगार लेखाकार महेश शिंदे यांनी सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सर्व शाळांना पासाचे फॉर्म आणि ओळखपत्रे मोफत देण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एसटी पास मिळण्यासाठी महाबळेश्वर आगार प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी निकम यांनी स्वागत भाषण केले. या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या योजना आणि शालेय पासबाबत उपयुक्त माहिती मिळाली.