घरकुल मागणी करिता कराड तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा संपन्न
कराड-( विद्याधर गायकवाड ) सन 2018 मध्ये प्रधानमंत्री घरकुल योजने करिता शासनाने गावोगाव सर्वे केला आणि ज्या लोकांना घराची आवश्यकता आहे. गरजू आणि पात्र लोकांची यादी तयार करून या यादीला ग्रामसभेने मान्यता दिली . त्यानंतर शासनामार्फतही या यादीला मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु गेल्या सहा वर्षांमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतकेच लाभार्थींना या घरकुल चा लाभ झालेला आहे. त्यामुळे कराड तालुक्यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त पात्र लाभार्थींना या घरकुलचा लाभ मिळालेला नाही निधी उपलब्ध करून दिलेला नाही. याकरिता शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता , कराड तालुका घरकुल संघर्ष समिती यांच्या वतीने सोमवारी भोर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दत्त चौक कराड येथून भव्य मोर्चाला सुरुवात झाली .
प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेनुसार अन्न, वस्त्र, निवारा देणे ही शासनाची जबाबदारी आहे .सन 2018 पासून कराड तालुक्यातील दहा हजार पेक्षा जास्त पात्र व गरजू घरकुलची यादी मंजूर केली असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा लाभ दिलेला नाही .त्यामुळे हे सर्व कुटुंब, आम्हाला घरकुल कधी मिळणार या आशे वरती गेले सहा वर्ष शासनाच्या निधीकडे डोळे लावून बसलेले आहेत . अनेक घरांची पडझड सुद्धा झालेली आहे ,अनेक घरांमध्ये जीव मुठीत घेऊन लहान मुले, वृद्ध लोक आणि महिला जीवन जगत आहेत .
या गोष्टीकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे म्हणून कराड तालुका घरकुल संघर्ष समिती यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .या मोर्चाद्वारे प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यामध्ये शासनाने ठरवलेल्या १)दीड लाख रुपये मध्ये घरकुल आजच्या काळामध्ये पूर्ण होत नाही. त्यामुळे घरकुलास 3 लाख निधी द्यावा.
२)ज्या ग्रामस्थांची नावे घरकुल प्रत्यक्ष यादी मध्ये आहेत परंतु गेले सहा वर्षे घरकुल न मिळाल्याने बँकेचे व सावकाराचे कर्ज घेऊन ज्याने घर बांधलेले आहे अशा लोकांना शासनाने पूर्ण निधी देण्यात यावा.
३)ज्या लाभार्थ्यांची नावे घरकुल प्रत्यक्ष यादी मध्ये आहेत परंतु त्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही अशा लोकांनाही शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. इत्यादी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार व कराड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व वागाव तालुका कराड येथील आदर्श सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चासाठी कराड तालुक्यातील शेकडो लाभार्थी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते, कराड तालुक्यातील विविध गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अनेक लाभार्थ्यांसह अनेक मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या बघण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा लोकशाही मार्गाने सुरूच राहील असेही आंदोलनकर्त्यांनी आणि संग्राम पवार यांनी निर्धार व्यक्त केला.
