गौरीशंकर सनशाईनचा विद्यार्थी नीरज कदमचे उज्वल यश सैनिकी परीक्षेत राज्यात चौथा तर जिल्हायात दुसरा क्रमांक
खटाव – गौरीशंकर ज्ञानपीठ संचालित सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई) खटाव येथील इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला निरज सुदाम कदम या विद्यार्थ्यांने सैनिक स्कूल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्वल यश प्राप्त केले त्याने ङिफेन्स कॅटेगिरीमध्ये राज्यात चौथा क्रमांक मिळवला तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला त्याने प्राप्त यशाबद्दल नुकताच स्कूलच्या प्राचार्या प्रमिला टकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. निरज कदम यांनी प्राप्त केले यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ.अनिरुध्द जगताप, जयवंत सांळुखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले.