गौरीशंकर फार्मसीचा शिशिकांत बनसोडे बुद्धिबळ स्पर्धेत विजेता
१५ महविद्यालयातील ६० स्पर्धकांचा सहभाग, विजेत्याना गौरविले
लिंब :- जयंतराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलीटेक्निक किल्ले मच्छिंद्रगड ता.वाळवा जि सांगली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ञ विद्यापीठ लोणेरे अंतर्गत आयोजीत केलेल्या विद्यापीठ स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धात गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब येथील तृतीय वर्ष बी फार्मसी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी शशिकांत बनसोडे यांनी प्रथम क्रमांका सह विजेतेपदाचा बहुमान पटकविला .
या स्पर्धेत विद्यापीठ अंतर्गत १५ महविद्यालयातील ६० स्पर्धाकानी सहभाग घेतला होता शशिकांत बनसोडे यांनी प्राप्त केलेल्या यशाबदल नुकताच गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महविद्यालयात
प्राचार्य डॉ योगेश गुरव याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास डॉ संतोष बेल्हेकर, डॉ भूषण पवार, डॉ धैर्यशील घाडगे , प्रा दुधेश्वर क्षिरसागर, प्रा शुभम चव्हाण प्रबंधक निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते.
शिशिकांत बनसोडे याला प्रा. दुधेश्वर क्षिरसागर, प्रा शुभम चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले
शशिकांत बनसोडे यांनी प्राप्त केलेल्या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप ,उपाध्यक्ष मिलिंद जगताप ,संचालक डॉ अनिरुध्द जगताप ,जयवंतराव साळुंखे, आप्प्या राजगे प्रशासकीय अधिकारी नितिन मुडलगीकर ,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, कायदेशीर मॅनेजर रवी जगताप यांनी अभिनंदन केले.
60 स्पर्धक व 15 महविद्यालयाचा सहभाग असलेल्या या स्पर्धात स्पर्धाकाच्या बौद्धिकतेचा कस लागला होता अटीतटीच्या झालेल्या स्पर्धात अखेर गौरीशंकर फार्मसी लिंबच्या शशिकांत बनसोडेने बाजी मारली . त्याला विद्यापीठ स्तरावरील प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देवून गौरविले शशिकांतच्या बुध्दीबळ स्पर्धातील यशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे