रविवारी सातारा येथे MPSC विद्यार्थींसाठी मोफत सेमिनार
ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा देणारा युवा वर्ग मोठा आहे. परंतु अचूक आणि योग्य मार्गदर्शना अभावी प्रत्येक विद्यार्थ्यांना यश मिळतेच असे नाही. ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाची उणीव भासत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर युवक मुंबई पुणे यासारख्या महानगरात जात आहेत. हीच गरज ओळखून दिशा अकॅडमीच्या वतीने साताऱ्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
या केंद्राच्या वतीने रविवारी 28 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी MPSC चे बदलते स्वरूप व अभ्यासाची दिशा या विषयावर सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन सेमिनार घेण्यात येणार आहे. या सेमिनार साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ सर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी दिशा अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नितीन कदम सर उपस्थित राहणार आहेत. सोबत इन्फिनिटी अकॅडमीचे प्रा. माधव जगताप उपस्थित राहणार आहेत. या सेमिनार चा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल व आगामी काळात होणाऱ्या MPSC व इतर स्पर्धा परीक्षां बाबत सखोल मार्गदर्शन होईल असे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.