परमेश्वराच्या विनेची झंकार म्हणजेच संगीत: शिरीष चिटणीस
सातारा ( प्रतिनिधी) परमेश्वराच्या विनेची झंकार म्हणजेच संगीत ज्याने संगीताच्या सात शहरामधील आनंद हा आयुष्यभर पुरणार असतो संगीत हे आत्मा पवित्र करण्याचे एक फार मोठे साधन व मनाला शुद्ध करण्याचे एक निर्भय रसायन आहे,असे प्रतिपादन मा.शिरीष चिटणीस यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा,प्रा.सलीम शिकलगार प्रस्तुत दिल का साझ ग्रुप भोर “मधुर गीतों का सफर” या गाजलेल्या सदाबहार हिंदी गीतांच्या मैफिलीत काढले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.लियाकत शेख डॉ.श्याम बडवे काका पाटील रमेश वेलणकर ,शिरीष चिटणीस ,अनिल वाळिंबे श्री.काळे साहेब प्रमोद लोंढे श्री जावळे ई.मान्यवर उपस्थित होते.
पुढे मा.शिरीष चिटणीस म्हणाले कराओके च्या कार्यक्रमातून रसिकांना मनमुराद आनंद देऊन त्यातून चांगल्या चांगल्या गाण्यातून रसिकांच्या मनामध्ये संगीताविषयी आवड निर्माण करणे व एक प्रकारे चांगले संस्कार निर्माण करण्याचे कार्य सविस्तर चालू आहे. संगीत समाजाला एकत्र आणण्याचे साधन आहे.
दैनंदिन जीवनामध्ये जुनी हिंदी गिते ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते. व एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते या कार्यक्रमासाठी उपस्थीतांनी आपापले मनोगत व्यक्त केले. साताऱ्यात सध्या बरेच करावोके ग्रुप्स आहेत,पण हा जो “दिल का साझ” ग्रुप सातारा बाहेरील असून तो भोर येथील श्री सलीम शिकलगार सरांनी एकसे बढकर एक गायक मित्रांना एकत्र करून, लाजवाब कायम लक्षात राहील अशा मोहम्मद रफी साहेबांच्या तसेच अन्य गीतांची सदाबहार गीतांची मेजवानी आज सातारकरांना दिली.“दिल का साझ”संगीतमाला मधुर गीतों का सफर, या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन झाले, या गीत मैफिलीमध्ये सदाबहार ओल्ड इज गोल्ड , प्रेमगीत, विरहगीत, सोलो गीत, ड्युएट गीत, तसेच इतर गीत प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
दिल का साझ”मधुर गीतों का सफर, या कार्यक्रमाची सुरुवात“मोहम्मद रफी तू बहुत याद आया” या हुबेहूब मोहम्मद अजीज यांच्या आवाजात ,सलीम सय्यद यांच्या सदाबहार गीताने झाली.त्यानंतर“दिल का साझ” ग्रुपचे सर्वेसर्वा प्रा.सलीम शिकलगार*सर यांनी महा अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं गीत गाऊन साक्षात मोहम्मद रफीजिंची आठवण करून दिली,
त्यानंतर ,सर्वात कमी वयाचा कलाकार पण आवाजाने भारदस्त आणि गोड असणारा ,मोईन शिकलगार यांनी आपल्या सुरेल आवाजात स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या “ये मेरा प्रेम पत्र पडकर, या गीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली,ग्रुपचे आधार स्तंभ शरीफ शिकलगार ,अत्यंत साधे पणात पण आपल्या खड्या आणि दमदार आवाजात मोहम्मद रफी यांच्या ,आने से उसके आये बहारया गीताने प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले…
आणि स्व. मोहम्मद रफी यांची आठवण करून दिली…
त्या नंतर सौ.शबाना शिकलगार मॅडम यांनी प्रत्यक्ष लताजींच्या आवाजात “तुम्ही मेरे मंदिर, हे गीत अत्यंत हुबेहूब आणि हृदय द्रावक आवाजात गाऊन प्रेक्षकांना लताजिंच्या आवाजातील गोडव्याची जाणीव करून दिली..
या नंतर एकसे बढकर एक अशी ड्युयेट गीतं सादर करण्यात आली…
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.शिरीष चिटणीस सर यांनी केले असून कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन प्रा.सलीम शिकलगार यांनी केले.
सदर कार्यक्रमास संगीत, साहित्य, कला, नृत्य, आर्थिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रातील तसेच इतर करावोके गायक मित्र आणि विविध मान्यवर उपस्थित होते. असा एक आखीव रेखीव आणि रसाळ असा ज्याची अविट गोडी कित्येक दिवस मनामध्ये रेंगाळत राहील असा उच्च प्रतीचा रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कार्यक्रम सादर करण्यात आला.
