Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » महाबळेश्वर मध्ये पर्यावरणाची गुणवत्ता आता ङिजिटल स्क्रीनवर-मुख्याधिकारी योगेश पाटील

महाबळेश्वर मध्ये पर्यावरणाची गुणवत्ता आता ङिजिटल स्क्रीनवर-मुख्याधिकारी योगेश पाटील

महाबळेश्वर मध्ये पर्यावरणाची गुणवत्ता आता ङिजिटल स्क्रीनवर-मुख्याधिकारी योगेश पाटील

महाबळेश्वर: महाराष्ट्रचे नंदन वन म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वर शहराला आता पर्यावरणाची गुणवत्ताआता डिजिटल स्क्रीन वर दिसनार आहे. गिरिस्थान नगरपरिषदेच्या या नव्या उपक्रमात शहरातील प्रमुख चौकात डिजीटल स्क्रीन बसवून पर्यावरणाचे निर्देशांक, शासकीय योजनांची माहिती आणि व्यावसायिकांच्या जाहिराती दाखवण्यास प्रारंभ झाला आहे.

या डिजीटल स्क्रीनद्वारे नागरिकांना तापमान, पर्जन्य, आद्रता, आवाजाची तीव्रता आणि हवेची गुणवत्ता यासारख्या पर्यावरणीय निर्देशांकांची माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, CO2, PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषणकारी कणांची माहितीही या स्क्रीनवरून मिळेल. यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना शहराच्या पर्यावरणाची गुणवत्ता समजून घेणे सोपे होणार आहे.

महाबळेश्वर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने पर्यावरणाची गुणवत्ता ही येथे महत्त्वाची बाब आहे. या नव्या उपक्रमामुळे पर्यटकांना महाबळेश्वरचे पर्यावरण किती स्वच्छ आहे याची खात्री होईल आणि ते येथे येण्यास उत्सुक होतील.

याशिवाय, नगरपरिषदेच्या विविध योजना आणि अभियानांची माहितीही या स्क्रीनवरून दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होईल. तसेच, व्यवसायिकांना आपल्या उत्पादने आणि सेवांची जाहिरात करण्यासाठी एक नवीन माध्यम मिळाले आहे.

महाबळेश्वर नगरपरिषदेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, “महाबळेश्वरचे वातावरण हे अत्यंत सुंदर असल्याने पर्यटक येथे भ्रमंती करायला आवडतात. या नव्या उपक्रमामुळे शहराचे पर्यावरणीय निर्देशांक डिजिटल रूपात उपलब्ध होणार असल्याने पर्यटन वाढीस चालना मिळेल. तसेच, शहारातील नागरिकांना आणि व्यवसायिकांनाही याचा फायदा होईल.”

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 8 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket