उंडाळे येते टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सदस्यांच्या वतीने प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
कराड प्रतिनिधी :स्वातंत्र्य दिनानिमित्त जि. प. प्राथमिक शाळा केंद्र उंडाळे येथे महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप यांचा वतीने उंब्रज गावचे टायगर ग्रुप अध्यक्ष पै.रवी भाऊ कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या सदस्यांच्या वतीने प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून सदस्यांच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात.
शाळेचे व्यवस्था कमिटी मधुकर पाटील सर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पै रविभाऊ कुडाळकर यांनी आपल्या भाषणातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना नतमस्तक झाले व त्याचबरोबर इथून पुढे येणारी युवा पिढी ही व्यसनाधीन होऊ नये व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शाळेच्या वतीने पै.रविभाऊ कुडाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व शाळेच्या व्यवस्थापकांनी आभार मानले.
टायगर ग्रुप उंडाळे कार्याध्यक्ष श्री शुभम भाऊ आंबवडे ,टायगर ग्रुप कराड कार्याध्यक्ष श्री सुरेश भाऊ पाटणकर, एक्का भाई जावळे ,प्रकाश मोरे, शिरीष आंबवडे, अनिकेत जावळे, प्रमोद पाटील,अक्षय पाटील व टायगर ग्रुप मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते.