Home » ठळक बातम्या » माता-भगिनींच्या आशीर्वादामुळे जयाभाऊ मोठ्या मताधिक्याने विजयी होतील- सौ.सोनियाताई गोरे

माता-भगिनींच्या आशीर्वादामुळे जयाभाऊ मोठ्या मताधिक्याने विजयी होतील- सौ.सोनियाताई गोरे 

माता-भगिनींच्या आशीर्वादामुळे जयाभाऊ मोठ्या मताधिक्याने विजयी होतील– सौ.सोनियाताई गोरे 

सातारा :भाजपा व महायुतीचे सरकार महिलावर्गांचा सर्वांगीण विकास साधणारे व त्यांना स्वाभिमान मिळवून देत त्यांचे हित पाहणारे सरकार आहे.माणखटावमध्येही आपल्या माता भगिनींच्या रक्षणासाठी व त्यांच्या सन्मानासाठी आ.जयकुमार गोरे कायम महिला वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे असतात.नुकताच त्यांनी म्हसवड, दहिवडी,वडूज येथे महिला मेळावे घेऊन त्यांचा सन्मान सोहळा केला आहे.या मेळाव्यांना महिलावर्गांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिला होता. त्यांचे प्रेम,साथ अन आशीर्वादच आ.गोरेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असे प्रतिपादन सौ.सोनियाताई गौरे यांनी केले आहे.

 माणखटाव मतदारसंघातील गावोगावी आ.जयकुमार गोरेंच्या प्रचारार्थ महिलावर्गाच्या बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी त्यांच्यासमवेत माणखटावच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 सौ.सोनियाताई गोरे म्हणाल्या,महायुतीच्या सरकारने माता-भगिनींसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत,उज्वला गँस,लाडकी बहिण सारख्या आदी विविध योजना सुरु केल्या आहेत.लाडकी बहीण योजना सुरु करुन त्यांच्या बॅंक खात्यात दरमहा दीड हजार रूपये जमा केले आहेत.त्यामुळे महायुती सरकारच्या पाठीमागे सर्व माताभगिनींचे आशिर्वाद असल्याने राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आहे.

 सौ.सौनियाताई गोरे म्हणाल्या,माणखटाव मतदारसंघात जलनायक आ.जयकुमार गोरे यांनी जलक्रांती घडवून आणली आहे.येणाऱ्या काळात त्यांनी औद्योगीक व शैक्षणिक क्रांतीचा अजेंडा हाती घेतला आहे.आजपर्यंत आपण सर्वांनी खंबीर साथ दिलीय तशीच साथ या निवडणूकीतही देऊन त्यांनी हाती घेतेलली कामे पू्र्णत्वास नेण्यासाठी मदत करावी.जनतेला कुटुंब मानणाऱ्या जयाभाऊला पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी मतदारसंघात गावभेट दौरे करत आहेत.या दौऱ्यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 देवेंद्र फडणवीस साहेबांचे ताकद वाढवण्यासाठी व महायुतीचे सरकार आणण्यासाठी आ.जयकुमार गोरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी मिळवून द्यावी असे आवाहनही त्या जनतेला करत आहेत.

सुसंस्कृत व साध्या राहणीमानामुळे सौ.सोनियाताईंनी महिलावर्गांच्या मनात केलेय घर..

 माणखटावच्या जनतेला आपल कुटुंब मानत आ.जयकुमार गोरे अहोरात्र त्यांच्यासाठी झटत आहेत.त्यांना बरोबरीने साथ देत सौ.सोनियाताई गोरे याही माणखटावच्या या कुटुंबासाठी पू्र्ण वेळ देत आहेत.त्यांच्या साध्या राहणीमानामुळे व सुसंस्कृतपणामुळे महिलावर्गासह नागरीकांच्या मनात त्यांनी घर केले आहे.तीन टर्म आमदाराची बायको म्हणून असा कोणताच अविर्भाव त्यांच्या वागण्यातून दिसून येत नाही.याउलट त्यांच्या बोलण्यातला गोडवा, आपुलेपणा,साधेपणामुळे त्या आपल्यातल्याच सर्वसामान्य आहेत अशी भावना होवून जाते.त्यामुळेच त्यांच्याजवळ महिला, नागरीक,युवक, विद्यार्थी आदी लोक आपले मन मोकळे करत असतात.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket