Home » ठळक बातम्या » रोबोटिक सर्जरी मधील पुण्यातील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे येत्या गुरूवारी, १४ नोव्हेंबर रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे

रोबोटिक सर्जरी मधील पुण्यातील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे येत्या गुरूवारी, १४ नोव्हेंबर रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे

रोबोटिक सर्जरी मधील पुण्यातील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे येत्या गुरूवारी, १४ नोव्हेंबर रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे

खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया आशेचा किरण

सातारा, दि. ११ : कमी वेदना, कमीत कमी रक्तस्त्राव, कमीत कमी हाडांचे नुकसान, जलद रिकव्हरी, सांध्यांचे उत्तम संरेखन, कमी धोके या वैशिष्ट्यांमुळे रुग्ण रोबोटिक सर्जरीला प्राधान्य देतात. रोबोटिक सर्जरी मधील पुण्यातील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे येत्या गुरूवारी, १४ नोव्हेंबर रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी करणार आहेत.

डॉ. सौरभ गिरी हे सध्या पुण्याच्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट अँड रिप्लेसमेंट विभागाचे प्रमुख आणि एकॉर्ड हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉ. सौरभ गिरी यांनी सांगितले की,

पारंपरिक शास्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अधिक फलदायी व सुखकारक आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळता येतात. संक्रमणाचा धोकाही कमी असतो. रक्तस्त्राव कमी होतो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर रिकव्हर होतो. त्यामुळे त्याचा रुग्णालयात ऍडमिट होण्याचा कालावधी कमी राहतो. विशेष म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्णाला चालता येते. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रिया खुबा व गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.

डॉ. गिरी हे रुग्ण तपासणीसाठी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन पासून सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार सातारा येथे उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९१६८४३२४३२ या हेल्प लाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटरने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket