Home » राज्य » शिक्षण » दिशा ॲकॅडमी आता आपल्या सातारा मध्ये रविवारी मोफत सेमिनार “१० वी नंतरच्या करिअरच्या वाटा”

दिशा ॲकॅडमी आता आपल्या सातारा मध्ये रविवारी मोफत सेमिनार “१० वी नंतरच्या करिअरच्या वाटा”

दिशा ॲकॅडमी आता आपल्या सातारा मध्ये रविवारी मोफत सेमिनार “१० वी नंतरच्या करिअरच्या वाटा”

माहितीची अभाव आणि आर्थिक कोंडी, या चक्रव्युहात पालक-विद्यार्थी होरपळून निघतात. बहुतांश वेळा १० वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. ही गैरसोय टाळण्यासाठीच शिक्षण क्षेत्रात नावाजलेली दिशा ॲकॅडमी आता सातारा शहरात देखील आपल्या शैक्षणिक सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. 

१० वी नंतर करिअरच्या विविध संधी जाणून घेण्यासाठी पालकांची तारांबळ उडत असताना दिशा ॲकॅडमीचे साताऱ्यातील दमदार आगमन पालक व विद्यार्थ्यांना सुखावणार आहे. यानिमित्त दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम याचा मोफत सेमिनार हॉटेल राधिका पॅलेस इथे आयोजित केला आहे. 

दिशाच्या सातारा शाखेची माहिती देतांना प्रा. नितीन कदम म्हणाले; “आर्थिक अडचणीमुळे शिक्षणाच्या वाटा खुंटू नये, दिशा ॲकॅडमीचा हा व्यापक दृष्टीकोन नेहमीच पालक आणि विद्यार्थ्यांना दिलास देत आला आहे. शिक्षणाचा उच्च दर्जा राखत आम्ही सर्व्वोत्तम सेवा देण्यासाठी तत्पर आहोत. विद्यार्थ्यांना होणार फायदा आणि दिशाची भुमिका समजून घेण्यासाठी विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी मोफत सेमिनारला जरूर यायलाच हवे.”

२१ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या या मोफत सेमिनार मध्ये १० वी नंतर करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा, परीक्षा उतीर्ण होण्याचे तंत्र; अशा महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. १० वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी या मोफत सेमिनारचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन दिशा ॲकॅडमीच्यावतीने करण्यात आले आहे. 

स्थळ – हॉटेल राधिका पॅलेस, राधिका रोड, सातारा

दिनांक व वेळ – २१ एप्रिल २०२४ रोजी, दुपारी ४ ते सायं ६ वा.

सेमिनारच्या अधिक माहितीसाठी संपर्क – 7775925923 / 8956407871 /8956407872

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket