देऊरमध्ये वार्षिक पारितोषिक सोहळा उत्साहात
सातारारोड, ता. २७ : देऊर (ता. कोरेगाव) येथील श्री मुधाईदेवी विद्यालय व मा. कृ. माने कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात झाला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच कला, क्रीडा व शाळाबाह्य विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड होते. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम होते. कार्यक्रमास पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी-रासकर, श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष हणमंतराव कदम, सचिव राजेंद्र कदम, विश्वस्त ॲड. संजीव कदम, धनसिंग कदम, प्रवीण कदम, राजाराम कदम, सतीश देशमुख, पोलिस निरीक्षक गहिनीनाथ सातव, कविता देशमुख, रतन शिंदे, तडवळेचे (संमत वाघोली) उपसरपंच राहुल भोईटे, कल्पेश भोज, ओंकार चव्हाण, अभिजित पवार, डॉ. शुभम लोखंडे, माजी विद्यार्थिनी वैशाली पवार, चेतना चव्हाण-लोहार, माजी प्राचार्य उत्तमराव महामुलकर, विजयसिंह गायकवाड, नितीन भंडारी, पर्यवेक्षक सुरेश निंबाळकर, मनेश धुमाळ, अशोक कदम, कार्यवाह संजय भोईटे, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल करपे, विद्यार्थिनी प्रतिनिधी साजमा सय्यद उपस्थित होते.
या वर्षाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून सूरज माने, आदर्श विद्यार्थिनी म्हणून हिंदवी कुचेकर, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून संचिता शिंदे यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते शालेय बगीचा विकसन प्रकल्पाचे भूमिपूजन, तसेच फनी गेम्स, सृजनाविष्कार, हस्तकला, संस्कृती कलादर्शन दालनाचे उद्घाटन व ‘सफर सह्याद्रीची’ या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय व्यायाम दर्शन, लेझीम पथकाचे प्रात्यक्षिक व विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्राचार्य प्रदीप ढाणे यांनी प्रास्ताविकात केले. प्रसाद गायकवाड व प्रा. नंदकुमार शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख यांनी आभार मानले.
