Home » गुन्हा » महाबळेश्वर येथील हॉटेल कामगाराचा वाईच्या धोम धरणातील पाण्यात बुडून मृत्यू

महाबळेश्वर येथील हॉटेल कामगाराचा वाईच्या धोम धरणातील पाण्यात बुडून मृत्यू

महाबळेश्वर येथील हॉटेल कामगाराचा वाईच्या धोम धरणातील पाण्यात बुडून मृत्यू

वाई प्रतिनिधी( शुभम कोदे )

महाबळेश्वर येथील एका मोठ्या नामांकित हॉटेल मध्ये काम करणार्या ३२ वर्षीय तरुणाचा वाईच्या धोम धरणात बुडुन मृत्यु झाल्याची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे .मनोजकुमार महेंद्र पाल सध्या राहणार बोंडारवाडी ता.महाबळेश्वर असे मृत तरुणाचे नाव आहे .

सविस्तर वृत्त असे की वाई सोमवार दि.१५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनोजकुमार

महेंद्र पाल वय ३२ आणी त्याचा मित्र संदीप बापु शिंदे वय २७ दोघेही राहणार बोंडारवाडी ता. महाबळेश्वर वरील दोघेजण हे आपल्या दुचाकी वरुन वाई येथील धोम धरण पाहण्यासाठी आले होते .पण दुपारच्या वेळी कडक ऊन्हाची तिव्रता असल्याने हे दोघेही व्याहळी गावच्या हद्दीत असणार्या धोम धरणात पोहण्यासाठी ऊतरले होते .पण या ठिकाणच्या पाण्याचा आणी येथे साठलेल्या गाळाचा या नवक्या दोन्ही तरुणांना न आल्याने पाण्यात उडी टाकताच मनोजकुमार पाल हा तरुण गाळात अडकल्याने तो गाळात खोलवर गेला तो परत वर आलाच नाही आणी बेपत्ता झाला .

या गंभीर घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांना समजताच त्यांनी याची माहीती त्या विभागाचे बिट अंमलदार असलेले श्रीनिवास बिराजदार यांना दिली व मनोजकुमार पाल याचा शोध घेण्यासाठी घटना स्थळावर जाण्यास सांगितले .बिट अंमलदार घटना स्थळावर पोहचले आणी स्थानीक नागरिकांचे सहकार्य घेवुन मनोजकुमारचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला .पण मनोजकुमार हा मिळुन आला नाही .रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली .

मंगळवार दि.१६ रोजी बीट अंमलदार श्रीनिवास बिराजदार हे पहाटेच घटना स्थळावर पोहचुन पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता

त्या वेळी मनोजकुमार महेंद्र पाल याने ज्या ठिकाणी उडी टाकली त्या ठिकाणच्या गाळात तेथील बोटक्लब चालक भोसले यांना सोबत घेऊन बिराजदार यांनी दोर आणी गळाच्या साह्याने शोध मोहीम गतीमान करुन ते मनोजकुमारच्या मृतदेहा पर्यंत पोहचले .हा मृतदेह खोलवर गाळात अडकला असल्याने त्यास दोरीच्या साह्याने बिराजदार यांनी बाहेर काढून त्याचा पंचनामा करुन तो शवविच्छेदना साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला .शवविच्छेदना नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनच्या ताब्यात देण्यात आला .या घटनेची तक्रार संदीप बापु शिंदे वय २७ राहणार बोंडारवाडी ता. महाबळेश्वर

यांनी वाई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे .याचा अधिक तपास पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार श्रीनिवास बिराजदार हे करीत आहेत .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket