Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आ.शिवेंद्रराजेंना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांची अपेक्षा साताऱ्यात दलित महासंघ भाजपसोबत

आ.शिवेंद्रराजेंना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांची अपेक्षा साताऱ्यात दलित महासंघ भाजपसोबत 

आ.शिवेंद्रराजेंना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांची अपेक्षा साताऱ्यात दलित महासंघ भाजपसोबत 

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )छत्रपतींचे वारसदार आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा व माझा स्नेह गेल्या पंचवीस वर्षापासूनचा आहे. महायुती शासनाने तसेच केंद्र शासनाने मातंग समाजाच्या समृद्धीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दलित महासंघ आ. शिवेंद्रराजेंसोबत खंबीरपणे उभा असून त्यांना विक्रमी मतदान करणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता येईल त्यात राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आमदार शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केली 

        साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी उपनगराध्यक्ष अविनाश दादा कदम, अमोल मोहिते, उमेश खंडुझोडे यांच्यासह दलित महासंघाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते 

               प्रा. सकटे म्हणाले, स्वर्गीय अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्याशी माझा गेल्या 30 वर्षापासून चा स्नेहबंध होता तेच नेतृत्व तेच संस्कार तीच कार्यपद्धती ही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आहे. केंद्र शासनाने मातंग समाजाच्या समृद्धीसाठी अनेक उपयोगी निर्णय घेतले आहेत राज्यांमध्ये सुद्धा महायुती सरकारने बार्टीच्या धरतीवर मातंग समाजासाठी वेगळे महामंडळ देण्याची घोषणा केली आहे त्याचे मी स्वागत करतो. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी व वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत हे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे व्यक्तिमत्व सर्वश्रुत आहे त्यामुळे दलित महासंघाच्या वतीने त्यांना साताऱ्यात पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.  

             आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, आमदार या नात्याने मातंग समाजाच्या समस्यां साठी कायम त्यांच्या बरोबर आहे त्यांचे महत्त्वाचे प्रश्न विधानसभेमध्ये पोहोचवण्यामध्ये सुद्धा मी कुठेही कमी पडणार नाही .साताऱ्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते त्यामुळे येथील प्रतापसिंह महाराज हायस्कूल आणि सदर बाजार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य झालेला आमणे बंगला येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाला निश्चित पाठपुरावा करून भूमिका घेणे संदर्भात परिस्थिती तयार करू असे थेट आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची 

Post Views: 72 मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची  कोल्हापूर जिल्ह्याच् कागल तालुक्यातील बिरदेण डोणेच्या यशातही

Live Cricket