नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ची साताऱ्यातून सुरुवात; कराडमध्ये आमदार मलेंदर राजन यांचा ब्लॉक निहाय कार्यकर्त्यांशी संवाद

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ची साताऱ्यातून सुरुवात; कराडमध्ये आमदार मलेंदर राजन यांचा ब्लॉक निहाय कार्यकर्त्यांशी संवाद

काँग्रेसच्या ‘संघटन सृज अभियान’ची साताऱ्यातून सुरुवात; कराडमध्ये आमदार मलेंदर राजन यांचा ब्लॉक निहाय कार्यकर्त्यांशी संवाद

कराड प्रतिनिधी -अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ची सुरुवात सातारा जिल्ह्यातून करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे आमदार मलेंदर राजन यांनी कराड येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर अभियान संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हा निरीक्षक संजय बालगुडे, , कराड शहर काँग्रेस अध्यक्ष अमित जाधव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, अजितराव पाटील, प्रदीप जाधव, गजानन आवळकर, सयाजी पाटील, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र काँग्रेस पक्ष संघटनात्मक फेरबदलाच्या तयारीत असून, या अभियानांतर्गत राज्यभरातील ७२ जिल्हाध्यक्षांची यादी अंतिम करण्यात येत आहे. तसेच, यापूर्वीच्या पद्धतींपेक्षा वेगळेपणा दाखवत ६७५ तालुक्यांमध्ये तालुका स्तरावरही नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा आणि काही मोजक्या चेहऱ्यांचे वर्चस्व याबाबत कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने तळागाळापर्यंत संघटनात्मक पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी बोलताना आमदार मलेंदर राजन म्हणाले की, सातारा जिल्ह्यासह राज्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्य जनता, महिला व शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत असून, भाजपला प्रभावीपणे विरोध करण्यासाठी पक्ष सक्षम होत आहे.

यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संजय बालगुडे म्हणाले कि, राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष हे वर्ष ‘संघटन बांधणीचे वर्ष’ म्हणून साजरे करत आहे. पक्षाची ताकद केवळ नेतृत्वापुरती मर्यादित न राहता ती बूथ स्तरावरही दिसली पाहिजे, यासाठी ब्लॉक पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

हे अभियान जिल्ह्यात तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच नव्या दमाच्या तरुणांना संधी देऊन पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket