वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » दीपलक्ष्मी पतसंस्था व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्री

दीपलक्ष्मी पतसंस्था व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्री 

दीपलक्ष्मी पतसंस्था व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्री 

     सातारा : दि.22 (प्रतिनिधी) दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, मर्या.,सातारा व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्री दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल 759 अ शनिवार पेठ सातारा येथे सोमवार दि. 23 सप्टेंबर ते शुक्रवार दि. 27 सप्टेंबर 2024 पर्यंत पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या पुस्तकाचा प्रदर्शनाचा समारंभ कार्यक्रम सोमवार दिनांक. 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.           

सदर पुस्तकाचे प्रकाशन श्रीराम नानल तसेच ज्येष्ठ पत्रकार-लेखक मुकुंद फडके यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. सदरची कार्यक्रमाची माहिती दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक- अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली असून सदरच्या पुस्तक प्रदर्शनात मान्यवर प्रकाशन संस्थेची वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून या प्रदर्शनात पुण्यातील दिलीपराज प्रकाशन पुणे, उत्कर्ष प्रकाशन, चपराक प्रकाशन, अक्षरबंध प्रकाशन,अमित प्रकाशन, साहित्यअक्षर प्रकाशन, समकालीन प्रकाशन व इतर प्रकाशकांच्या पुस्तकांसह अन्य प्रकाशनांची लोकप्रिय तसेच दुर्मिळ पुस्तके 25 ते 40 टक्के सवलतीत सातारकर वाचक ,ग्रंथप्रेमींसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. पाच हजाराहून अधिक पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याने सातारकरांसाठी ही मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठ,अशी प्रदर्शनाची वेळ असून प्रदर्शन सोमवार दि. 23 सप्टेंबर 2024 ते शुक्रवार दि. 27 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. असे शिरीष चिटणीस यांनी नमूद केले

       या पुस्तक प्रदर्शनाच्या अगोदर सुद्धा दीपलक्ष्मी पतसंस्था व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार यांनी सोमवार दि.12 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट तसेच सोमवार 2 सप्टेंबर ते गुरुवार 5 सप्टेंबर 2024 असा पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा आठवड्याहून जादा काळ महोत्सव भरवला होता व त्यास सातारकर वाचक यांचा भरगोस पाठिंबा मिळाला.

     तरी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांनी या पुस्तक प्रदर्शनास संपर्क साधून 40% पर्यंत सवलत मिळून पुस्तके खरेदी करावे तसेच सातारच्या समस्त पुस्तक प्रेमी, ग्रंथप्रेमी,वाचकांनी पुस्तक प्रकाशनाच्या व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket