भाजपचे उमेदवार आ.जयकुमार गोरेंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणूयात-शेखरभाऊ गोरे
माणखटाव मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव अटळ
सातारा : प्रतिनिधी राज्यात भाजप महायुतीचे सरकार येणार आहे हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.माणखटाव साठी भाजप व महायुती सरकारने भरीव निधी देत सिंचन योजना मार्गी लावल्या आहेत.तसेच गावोगावी कोट्यावधी रूपयांची विविध विकासकामे केली आहेत.तसेच माणखटावची उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांची ताकद वाढवणे गरजेचे आहे.यासाठी या सरकारमध्ये आपल्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी असणे गरजेचे असून आपण सर्व मिळून भाजप महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूयात असे आवाहन सातारा जि.बँकेचे संचालक व माणखटावचे नेते शेखरभाऊ गोरे यांनी केले आहे.
माण खटाव तालुक्यात भाजपचे उमेदवार आ.जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ कोपरासभा प्रसंगी ते बोलत होते.
शेखरभाऊ गोरे म्हणाले,महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शब्द बदलणारे असतील तर त्यांच्या बगलबच्चांकडून व नेत्यांकडून जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या.त्यांनी दिलेले उमेदवार तर कायम चंद्रावरच असतात. कारखानदारीच्या नावाखाली काटामारीतून शेतकऱ्यांची लूटमार करण्यात ते माहीर आहेत.अन आपले गैरप्रकार चव्हाट्यावर आणणाऱ्या कामगाराचा खून करून त्यांचे कुटुंब उध्वस्त करणारे माणखटावच्या जनतेचे काय हित पाहणार आहेत.कार्यकर्त्यांसाठी तसेच राजकीय संघर्षातून केसेस पडणे,तुरूंगात जाणे असे प्रकार आजकाल अनेकांच्या राजकीय जीवनात येत असतात.परंतू आमदारकी ,जि.बँकैचे संचालक पदावर असणाऱ्यांनी एका कामगराचा खून करून सर्वसामान्य कुटुंबाचे जीवन उध्वस्त करण्याचे पाप केले आहे.अशा खूनाच्या आरोपाखाली दोन वर्षे तुरूंगवास भोगून आलेल्या आरोपीला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
लोकसभेला विरोधात काम करूनही पवारांनी त्यांना उमेदवारी देऊन माणखटावमधील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची चेष्टा केली आहे.या विरोधात त्यांच्या अंतर्गत प्रचंड नाराजी आहे.राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत ते असले तरी त्यांची नाराजी 23 तारखेला दिसून येईल.त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फरकाने पराभव अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या तीनही पंचवार्षिक निवडणूकीत आपल्या गटाने ज्यांना मदत केलीय.ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत.आपण ज्यांना मदत करतो त्यांचा गुलाला फिक्स असतो.यावेळी आपली ताकद भाजपचे उमेदवार आ.जयकुमार गोरेंच्या पाठीशी उभी केली आहे.त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.आता फक्त आपल्याला त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचेही शेखरभाऊ गोरेंनी यांनी सांगितले.
शेखर गोरे गटात इनकमिंग जोरात…
माणखटाव मतदारसंघातील विविध गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आपल्या गटात प्रवेशाचा धडाका सुरू आहे.त्यामुळे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकू लागलीय.त्यांना याचा मोठा फटका बसणार असून इनकमिंगचा फायदा भाजपाचे उमेदवार आ.जयकुमार गोरेंना होणार आहे.आपल्या गटाकडे उघड प्रवेशाबरोबरच छुपे अंतर्गत प्रवेश भरपूर आहेत.राष्ट्रवादीबरोबर फिरणारे अनेकजण आपल्याबरोबर आहेत.ते त्यांना निकालावरून 23 तारखेला दिसून येईल.
सोसायटी सचिव व जि.बँकेच्या कर्मचाऱ्यांना इशारा….
या निवडणूकीत सोसायटीचे सचिव व जि.बँकेचे कर्मचारी प्रचारात दिसून येत आहेत.राजकारण करताना आपण नोकर आहे हे लक्षात ठेवावे. आपण ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करताय त्यांचा पराभव 23 तारखेला ठरलेला आहे.मी पण जि.बँकेचा संचालक आहे.त्यानंतर तुमची गाठ शेखर गोरेशी असेल एवढ लक्षात ठेवा.असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराच बाटली चिन्ह हव होत….
राष्ट्रवादीच्या उमेदवाराच अन बाटलीच नात वेगळ आहे.त्यामुळे त्यांना खरतर बाटलीच चिन्ह मिळायला हव होत.तस असत तर बाटली हेच माझ चिन्ह आहे दाखवत त्यांची प्रचारादरम्यान कुठेही अन कधीही सोय झाली असती.