कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये जनतेने दोन वेळा नाकारलेले उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांना भाजपचा पुन्हा ताकद देण्याचा प्रयत्न
सातारा: (अली मुजावर )कराड मतदारसंघात 1960 पासून काँग्रेसचं वर्चस्व आहे. विधानसभेच्या 13 निवडणुकांमध्ये काँग्रेसनेच बाजी मारली आहे.कराड दक्षिणची लोकसभा 2024 ला बदलेली समीकरणं ; भाजपासाठी फायदेशीर ठरलेली आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसला बालेकिल्ला राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
2014 मध्ये ही जागा जिंकून मा.पृथ्वीराज चव्हाण चव्हाण यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला. चव्हाण यांना 76,831 मते मिळाली, तर विलासराव उंडाळकर-पाटील यांना 60,413 आणि भोसले यांना 58,621 मते मिळाली
भाजप नेते अतुल भोसले यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात विकास कामाबरोबरच भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांचे वेळोवेळी मेळाव्यातून ताकत देण्याचा प्रयत्न करताना भाजप दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले यांना ताकद देण्याचा प्रयत्न लोकसभेला भाजपासाठी फायदेशीर ठरला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाजपचे नेते अतुल भोसले हे पारंपारिक विरोधक आहेत. डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड उत्तर मधून ही एकदा नशीब आजमावले होते परंतु त्यात अपयश आले. आ.बाळासाहेब पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता कराड दक्षिण म्हणजे काँग्रेस अशी मतदारसंघाची ओळख यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्माण केली आहे. ही परंपरा खंडीत करण्यासाठी दोन वेळा विधानसभेला पराभूत असणारे अतुल भोसलेंकडून भाजपच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हात पहिल्यांदाच उदयनराजे भोसलेंच्या रुपाने भाजपचा खासदार निवडून आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणमध्ये भाजपचा आमदारही निवडून आणण्यासाठी भाजपने फिल्डींग लावली आहे.विजयात कराड दक्षिणने चांगलीच बाजी मारुन मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना मिळालेल्या ३० हजारांहुन अधिक मतांपेक्षा ६१६ मतं अधिक मिळवण्यात यश मिळवले. त्यासाठी भाजपचे अतुल भोसले यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. कराड दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असुनही तो भाजपच्या उमेदवाराला प्लस झाल्याने अतुल भोसलेंसह भाजपच्या नेत्यांचा विश्वास दुणावला आहे. त्यांनी आता यावेळी विधानसभा जिंकायचीच असा निर्धार करुन त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत विधानसभेला आमदारकीसाठी तीन वेळा प्रयत्न केले आहेत एकदा राष्ट्रवादीकडून कराड उत्तर मधून त्यांनी उमेदवारी मिळावली होती परंतु त्यांना त्यात अपयश आले. 2014, 2019 च्या विधानसभा इलेक्शन मध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली.2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब यांनी भारतीय जनता पक्षाचे डॉ.अतुलबाबा सुरेश भोसले यांचा 9130 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली.
चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब
INC
९२,२९६ मते
9,130 आघाडी
43.90% मते
डॉ.अतुलबाबा सुरेश भोसले
भाजप
83,166 मते
39.56% मते
ॲड. उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळकर)
IND
29,401 मते
13.99% मतांचा वाटा
कराड (दक्षिण) विधानसभा क्षेत्र 1960 मध्ये निर्माण झाल्यापासून जुन्या पक्षाचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत झालेल्या 13 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप किंवा शिवसेनेला ही जागा कधीही जिंकता आलेली नाही. सुमारे तीन लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, विशेषत: उसाची शेती आहे. राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या कराड दक्षिण मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि एडवोकेट उदयसिंह पाटील एकत्रित असल्याने भाजपाला हा विधानसभा मतदारसंघ विजय मिळवणे अवघड असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.