बाळासाहेब भिलारे यांच्या कार्याचा वसा पुढे चालू ठेवणार
बाळासाहेब भिलारे यांच्या आठवणीने आ.मकरंद पाटील भावनावश…
सातारा दि-बाळासाहेब भिलारे यांनी संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वाहून घेतले.त्यांचा सहवास,मार्गदर्शन लाभले हे माझे भाग्यच.त्याच्या विचारांचा वारसा घेऊनच भविष्यातील वाटचाल करणार असल्याचे प्रतिपादन आ.मकरंद पाटील यांनी केले.दरम्यान बाळासाहेब भिलारे यांच्या आठवणीने आ.मकरंद आबा भावनाविवश झाल्याने कार्यकर्त्यांचे डोळे सुध्दा पाणावले…
भिलारे ता.पचागणी येथील प्रचार सभेत आ.पाटील बोलत होते.या प्रसंगी नितीन भिलारे,राजेंद्र भिलारे,प्रवीण शेठ भिलारे,तनाजी भिलारे,वैशाली भिलारे,प्रशांत भिलारे,शिवाजी भिलारे,विक्रम भिलारे ई मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आ.पाटील म्हणाले की स्वर्गवासी बाळासाहेब भिलारे यांनी त्यांचं संपूर्ण जीवन समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतलं होत.माझ्या प्रत्येक विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.ते माझे मार्गदर्शक होते.त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला राजकारणामध्ये समाजकारण आणि समाजसेवेची शिकवण मिळाली.
भिलारे गाव आणि या परिसरातील ग्रामस्थ नेहमीच माझ्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले आहेत.बाळासाहेब भिलारे यांनी महाबळेश्वर तालुक्यासाठी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांच्यासाठी माझी आदरांजली असेल.भिलारे ग्रामस्थांसाठी हा मकरंद पाटील माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यशील असेल.
राजूशेठ राजपूरे म्हणाले की आमदार जेष्ठ नेते लक्ष्मणराव पाटीलजेष्ठ नेते,स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या मार्गदर्शनामुळे आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांनी समाजसेवेची आवड निर्माण झाली.त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी तर आता आ.मकरंद पाटील यांना ताकत देण्याची आवश्यकता आहे.आमदार मकरंद पाटील यांच्या विजयासाठी वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघातील हजारो कार्यकर्ते अहोरात्र प्रचार करतायत,जिवाचं रान करतायत.त्यामुळेच आमदार मकरंद पाटील मताधिक्यात मागील निवडणुकीची रेकॉर्ड मोडीत काढत प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत.