भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश वाडकर .
खंडाळा : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जन्मभूमी नायगाव येथील शिक्षण क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश वाडकर यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष अडसूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नायगाव ता. खंडाळा येथील भैरवनाथ शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालय चालविले जाते. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश वाडकर , उपाध्यक्षपदी सुभाष अडसूळ तसेच सचिवपदी कृष्णाजी झगडे , सहसचिवपदी गणेश नेवसे , खजिनदारपदी सुधीर नेवसे , संचालकपदी शिदूनाना नेवसे , के.वाय. नेवसे , बी. एस. नेवसे , निवृत्ती कानडे , शामराव नेवसे ,नितीन सुतार , गणपत नेवसे , आकाश नेवसे या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थ व तालुक्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले.