तांबवे फाटा साकुर्डी पेठ येथे गटाराचे पाणी रस्त्यावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, सगळीकडे दुर्गंधी
कराड – साकुर्डी पेठ (तांबवे फाटा)ता. कराड येथे कराड-पाटण मार्गासाठी बांधण्यात आलेल्या गटाराचे दूषित पाणी रस्त्यावर येत असून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या दूषित पाण्यातूनच वाहनांची ये-जा सुरु असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कराड-पाटण मार्गाचे रुंदीकरण व दर्जा उन्नतीचे काम पूर्ण होऊन अनेक वर्ष झाली तरी आजही या रस्त्याच्या कामाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर ठेकेदार कंपनीच्या गलथान कारभारामुळे रस्त्याकडेला बांधण्यात आलेले गटर शोपीस बनले आहेत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी नाल्यामध्ये जात नसल्याने ते रस्त्याच्या साईड पट्ट्यांवरून वाहत असल्याचे दिसून येते. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत. भविष्याच्या दृष्टीने रस्त्याचे काम दर्जेदार करणे अपेक्षित असतानाही अनेक त्रुटी असल्यामुळे वाहनधारकांना कित्येक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा बांधलेले गटर हा एक मुद्दा चांगलाच चर्चेत असून हे गटर नेमके कशासाठी आहेत असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी गटारात जात नसल्याने ते सरळ नाल्याच्या बाहेरील बाजूने रस्त्यावरून वाहत जात आहे. त्यामुळे जोरदार पावसात काही ठिकाणी रस्त्याला ओढ्याचे स्वरूप होते. बांधीव गटरची उंची रस्त्यापेक्षा उंच झाल्यामुळे रस्त्यावरील पाणी गटरमध्ये जात नाही. तसेच काही
ठिकाणी गटरचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. साकुर्डी पेठ येथे गटर तुंबलेल्या अवस्थेत आहे. तसेच गटरचे दुषित पाणी तांबवे रस्त्यावर येत असून ते सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी येते आहे.स्थानिक नांगरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याठिकाणी व्यापारी दुकाने असून बस, वडाप थांब्याचे हे ठिकाण आहे. त्यामुळे ग्राहक व प्रवासी वर्गाची मोठी संख्या असते. मात्र, गटरच्या दूषित पाण्यामुळे नाक मुठीत धरून राहावे लागत आहे.
गटातील पाणी रस्त्यावर आले ने रस्त्या खड्डे पडले आहेत.साकुर्डी ते तांबवे या रस्त्यावर पाणी वाहत आहे.याकडे बांधकाम विभाग चे दुर्लक्ष केले आहे.
कराड पाटण रस्त्याचे काम ठेकेदार ने निकृष्ट दर्जाचे केले आहे.रस्तावर अनेक ठिकाणी क्राॅक्रेंट रस्त्यावर चिरा व खड्डे पडले आहेत.साईड पट्ट्याचें काम केले नाही.