Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विधानसभेला आमदार मकरंद पाटलांचा विजयरथ रोखणार कोण?

विधानसभेला आमदार मकरंद पाटलांचा विजयरथ रोखणार कोण? 

विधानसभेला आमदार मकरंद पाटलांचा विजयरथ रोखणार कोण? 

सातारा (अली मुजावर )-सातारा जिल्ह्यातील वाई- खंडाळा- महाबळेश्वर विधानसभा मतदार संघ सर्वात मोठा असून या ठिकाणी वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मकरंद पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तर त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून मदन भोसले हे पारंपारिक विरोधक आणि विधानसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असले तरी युवा नेतृत्व विराज शिंदे( राष्ट्रीय काँग्रेस), डॉक्टर नितीन सावंत( राष्ट्रवादी शरद पवार गट ) पुरुषोत्तम जाधव( शिवसेना शिंदे गट ) या उमेदवारांचेही तगडे आवाहन हॅट्रिक आमदार मकरंद पाटील यांना आहे.

सध्या मात्र तिनी पक्ष महायुतीमधून सत्तेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वाई मतदार संघात उमेदवारीवरुन महायुतीतच खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांकडे केलेल्या आमदारांना पाडणारच असा चंग शरद पवार यांनी बांधला आहे. लोकसभेला झालेल्या अनेक राजकीय सभेमध्ये शरद पवार गटातून आमदार मकरंद पाटील यांना टार्गेट करण्यात आले आहे.

आ.मकरंद पाटलांचे वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा जनसंपर्क आणि सर्वसामान्य जनतेसाठी 24 तास राबणारे नेतृत्व म्हणून आमदार मकरंद पाटील लोकप्रिय आहेत.२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.

 नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असला तरी वाईमधून त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. हेच मताधिक्य मकरंद पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा असून शरद पवार हे विधानसभेला मकरंद पाटील यांना रोखण्यासाठी तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे.वाई मतदार संघात मकरंद पाटील चौकार मारणार की त्यांचा विजयरथ रोखण्यासाठी महाविकास आघाडी मोठा डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव खंडाळा तालुक्यातील असून वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघात त्यांना मानणारा मतदार आहे. लोकसभेसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीसाठी ताकद लावली होती. शिवसेनेला यावेळेस हा मतदारसंघ सोडावा, अशी आग्रही मागणी होती मात्र त्यांना हायकमांड द्वारे शब्द देण्यात आला होता त्यावेळी त्यांनी लोकसभेला माघार घेऊन भाजप उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे एक दिलाने काम करून खंडाळा तालुक्यातून प्रामाणिक काम केले होते. वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क पाहता तेही यावेळी आग्रही असून त्यांची निर्णायक भूमिका महायुतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

काँग्रेसचे युवा नेतृत्व आक्रमक विराज शिंदे यांनी गेल्या साडेचार वर्षांमध्ये वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघामध्ये स्वतःची वेगळी आणि आक्रमक ओळख निर्माण केली आहे. वाई विधानसभा मतदारसंघात त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून निधी आणून विकासात्मक वाटचाल सुरू केली. कोविडच्या कालावधीमध्ये त्यांनी मतदार संघामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी धावून जाऊन सर्वोत्कृष्ट कार्य केले आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून वाई विधानसभा मतदारसंघात त्यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे.

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात शांत संयमी डॉक्टर नितीन सावंत यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. मूळचे वाई तालुक्यातील असणारे डॉक्टर नितीन सावंत यांनी खंडाळा तालुक्यातील पाणी प्रश्न असो अथवा खंडाळा साखर कारखाना याविषयी सातत्याने आवाज उठविला आहे. डॉक्टर नितीन सावंत राजकारणात जरी नवीन असले तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून वाई विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारीसाठी त्यांचे नाव अग्र क्रमांकावर आहे.

आमदार मकरंद पाटील यांचे गावोगावचे संघटन आणि सर्वसामान्य लोकांचा विश्वास या जमेच्या बाजू आहेत.नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकी मध्ये त्यांचे बंधू नितीन पाटील बिनविरोध खासदार झाल्याने आमदार मकरंद पाटील यांची ताकद वाढली आहे. जननायक’ म्हणून ओळख असलेले आमदार आहे. राष्ट्रवादीतील बंडाच्या दिवशी आमदार मकरंद पाटील शिरवळपासून पवारांसोबत दिवसभर गाडीत होते. मात्र दुसऱ्याच दिवशी किसन वीर साखर कारखान्याचे हित आणि कार्यकर्त्यांनी ढाल पुढे करत मकरंद पाटलांनी अजितदादांना पाठिंबा दिला होता. हे अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रुचले नसल्याचे स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी खाजगीत बोलून दाखवतात. मात्र शांत संयमी जननायक आमदार मकरंद पाटील आपला गड राखणार की नाही जनताच ठरवणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket