Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अमित शहा म्हणजे अहमदशाह अब्दालीचा राजकीय वारस! उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

अमित शहा म्हणजे अहमदशाह अब्दालीचा राजकीय वारस! उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल 

अमित शहा म्हणजे अहमदशाह अब्दालीचा राजकीय वारस! उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

“शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतला नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी आले होते. त्यांचे मोहरके आले. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आला होता. तोही शाहच होता. तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. तो वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफची केक खाणारी औलाद तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते पुणे येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

“तुम्ही विश्वासघात केला. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असं शंकराचार्य म्हणाले. तुम्ही काय करता. तुमचे पूर्वज काढा, 1940 पासून. श्यामाप्रसाद मुखर्जी, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडू लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केलं. चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे,. नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहे. त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. आणि आम्हाला हिंदुत्वाचं विचारता. तुमचं काय आहे ते सांगा?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारा

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket