कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी केले वृक्षारोपण
तांबवे :वसंतगड ,ता.कराड. येथे कृषी सप्ताह निमित्त कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी वृक्षारोपण केले. कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र हसुरे, कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनील अडांगळे,केंद्रप्रमुख डॉ. राणी निंबाळकर व विषय विशेषतज्ञ डॉ. नंदकिशोर टाले या मान्यवरांच्या मार्गदर्शनाने कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या रिद्धी खैरे , आर्या कुलकर्णी ,स्नेहल लोंढे ,.त्रिवेणी कोमरा, वैष्णवी बाबर व श्रेया पाटील यांनी वसंतगड ग्रामपंचायत समोर सरपंच अमित नलवडे, ग्रामसेवक व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.