Home » ठळक बातम्या » लोकसभा निवडणुकीनंतर घानबी विभागात मोबाईल टॉवर उभारून हा परिसर संपर्क क्षेत्रात आणला जाईल – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

लोकसभा निवडणुकीनंतर घानबी विभागात मोबाईल टॉवर उभारून हा परिसर संपर्क क्षेत्रात आणला जाईल – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार 

लोकसभा निवडणुकीनंतर घानबी विभागात मोबाईल टॉवर उभारून हा परिसर संपर्क क्षेत्रात आणला जाईल – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

पाटण : दुर्गम घाणबी विभागात पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई, घाणबीचे सरपंच प्रकाश सपकाळ, सुभाष शिर्के, रामभाऊ पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, बाळासाहेब पाटील, गणपती यादव, मिलिंद पाटील, अमोल जगताप, विठ्ठल जगताप यांची प्रमुख उपस्थित होती.

या परिसरात पूर्वी आलो होतो तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानाचा परत जाणवतो आहे असे उदयनराजे म्हणाले. श्री शंभूराज देसाई यांनी हा सर्व परिसर डांबरी रस्त्याने जोडून या परिसराचा कार्यपालट हाती घेतला आहे. या परिसरातील अनेक लोक पुणे मुंबई ठाणे या परिसरात वास्तव्यास आहेत. या परिसरामध्ये मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे अनेकदा कठीण प्रसंगात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या विभागाचे आमदार व पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या साथीने या परिसरामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.

श्री शंभूराज देसाई म्हणाले, या भागात दळणवळणाची साधने नव्हती. डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून आम्ही येथील विकास सुरू केला. विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. या भागातील एक एक मत आपल्याला महत्त्वाचे आहे. निवडणुकीत उदयनराजेना मोठे मताधिक्य देण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )-हिंदू बहुजन सन्मान

Live Cricket