Home » Uncategorized » अण्णा बाळा पाटील विद्यालयातील 46 वर्षानंतर बाल सवंगडी एकत्र आले.सन 1978 च्या इयत्ता दहावी विद्यार्थ्यांनी या मेळावा कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

अण्णा बाळा पाटील विद्यालयातील 46 वर्षानंतर बाल सवंगडी एकत्र आले.सन 1978 च्या इयत्ता दहावी विद्यार्थ्यांनी या मेळावा कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

तांबवे- येथील अण्णा बाळा पाटील विद्यालयातील 46 वर्षानंतर बाल सवंगडी एकत्र आले.सन 1978 च्या इयत्ता दहावी विद्यार्थ्यांनी या मेळावा कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

  सर्व विद्यार्थी सकाळी नऊ वाजता अण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हजर झाले शाळेला भेट दिली. सदर स्नेह मेळाव्याला प्रमुख पाहुणे शाळेचे माजी मुख्याध्यापक एम जे पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष बी एम सुर्यवंशी हे होते.उपस्यिती मध्ये शिक्षक आर. आर.पाटील ,जे.बीचव्हाण,आर .टी. डोंबे , लेखनिक विलास देसाई, सुशीला बाळासाहेब पाटील हे होते.

 यावेळी एम. जे‌. पाटील म्हणाले शाळेवर असेच प्रेम राहू द्या,सध्याची पिढी मोबाईल मुळे घसरत चाललेले आहे त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम आता तुमचे आहे.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष बी एम सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र गीताने आपल्या भाषणाची सुरुवात केली, शरीराकडे लक्ष द्या, आरोग्य हे जीवनाचे सूत्र आहे त्याला व्यायामाची योगाची साथ द्या असे सांगितले .                             या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी सुत्रसंचलन प्रा डॉ विजय वाडते यांनी व आभार तात्यासाहेब पाटील यांनी मानले . 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चे औचित्य साधून या 54 विद्यार्थ्यांनी आपल्या शेतामध्ये किंवा घराशेजारी जागा असेल तिथे लावून ती झाडे जगवली जातील असा संकल्प केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket