नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » धार्मिक » भिलारमध्ये ३० वर्षांनंतर पुन्हा भरली वर्गमित्रांची शाळा; आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा उत्साहात

भिलारमध्ये ३० वर्षांनंतर पुन्हा भरली वर्गमित्रांची शाळा; आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा उत्साहात

भिलारमध्ये ३० वर्षांनंतर पुन्हा भरली वर्गमित्रांची शाळा; आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा उत्साहात

पाचगणी-केंद्र शाळा भिलार ता महाबळेश्वर च्या १९९२ सालच्या सातवीच्या वर्गातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल ३० वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, शाळेची प्रार्थना आणि प्रतिज्ञेने करण्यात आली. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या वातावरणात एकत्र आल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. शालेय जीवनातील खोड्या, अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या.

मेळाव्याचे प्रमुख आकर्षण योग व ध्यान प्रशिक्षक महिंद्र भिलारे यांचे मार्गदर्शन ठरले. त्यांनी योग आणि ध्यानाचे महत्त्व विशद करत तणावमुक्त, निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली कशी अंगीकारावी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी संगीत खुर्ची, गाण्यांच्या भेंड्या, विविध मनोरंजनात्मक खेळ तसेच मनोगत व्यक्त करण्याचे सत्र आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांमधून सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद लुटला. मुंबई, पुणे, सातारा, पाचगणी तसेच परिसरातील विविध भागांतून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम्‌ने करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी महिंद्र भिलारे, बिपिन भिलारे, संजय भिलारे, राजाराम बिरामणे, सचिन भिलारे, वसंत भिलारे आणि सुधाकर मानकुंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket