कनिष्का स्कूलमध्ये नर्सिंग, पॅरामेडिकल कोर्सेससाठी प्रवेश सुरू
सातारा: कनिष्का नर्सिंग कॉलेज व पॅरामेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासन व नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त आर.ए.एन.एम, आर.जी.एन. एम. हे दोन व तीन वर्षीय नर्सिंग कोर्स तसेच डी.एम.एल.टी. कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या नर्सिंग कोर्ससाठी १२ वी पास शैक्षणिक पात्रता असून मर्यादित विद्यार्थी संख्या, अल्प शुल्क, मेस व वस्तीगृहाची सोय, नोकरी व शैक्षणिक कर्जाची सोय, एस.सी., एस.टी. प्रवर्गातील मुलींसाठी समाजकल्याण शिष्यवृत्ती आदि सुविधा उपलब्ध आहेत. येथे नेत्रचिकित्सा सहायक १० वी पास ६ महिने, आरोग्यसेवक व आरोग्यसेविका नर्सिंग कोर्स १० वी पास-नापास १ वर्ष, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणजेच सी.एम.एल.टी. कोर्ससाठी १० वी पास १ वर्ष, ऑपरेशन थिएटर सहाय्यक १२ वी पास कालावधी ६ महिने, एक्स रे टेक्निशियन १० वी पास १ वर्ष, अतिदक्षता विभाग सहाय्यक १२ वी पास १ वर्ष, पंचकर्म सहायक १० वी पास १ वर्ष, आहार तज्ज्ञ १२ वी पास २ वर्ष, ईएमएससाठी पात्रता बी.ए.एम.एस.बी.एच.एम.एस.एम. बी.बी.एस. १ वर्ष, डायलिसीस टेक्निशियन १० वी पास १ वर्ष, हॉस्पिटल मॅनेजमेंट 1वर्ष कोणत्याही शाखेचा पदवीधर हे कोर्सेस उपलब्ध आहेत. कॉलेजमध्ये लेडीज हॉस्टेल, नोकरी करणाऱ्या महिला पुरुष, विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सुविधा असून कनिष्का ज्ञानपीठ व आरोग्य संस्थेस देणगी दिल्यास ८० जी अंतर्गत व्यवसाय कर सवलत मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी कनिष्का स्कूल ऑफ नर्सिंग, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नीलेश थोरात यांनी केले आहे.