Home » राजकारण » आबांच्या प्रचाराला धावला भाऊ ; मकरंद आबा पाटील तुमच्या प्रेमावर यावेळी चौकार मारतील : अभिनेते भाऊ कदम

आबांच्या प्रचाराला धावला भाऊ ; मकरंद आबा पाटील तुमच्या प्रेमावर यावेळी चौकार मारतील : अभिनेते भाऊ कदम 

आबांच्या प्रचाराला धावला भाऊ ; मकरंद आबा पाटील तुमच्या प्रेमावर यावेळी चौकार मारतील : अभिनेते भाऊ कदम 

पांचगणी तारीख.११ : आ. मकरंद आबा पाटील यांना तुम्ही जनतेने जननायक ही दिलेली पदवी त्यांच्या कामामुळे दिली आहे. हे मला तुमच्या प्रचंड प्रतिसादावरून दिसत आहे. सदैव जनतेसाठी काम करणारे आबा यांनी गतवर्षी हॅटट्रिक केली आता ते विजयाचा चौकार नक्कीच मारतील असा विश्वास चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध कलाकार आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर आला आहे. वाई – खंडाळा – महाबळेश्वर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. मकरंद आबा पाटील यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक भाऊ कदम हे खिंगर (तालुका. महाबळेश्वर ) येथे आले होते. यावेळी ते मतदारांशी संवाद साधत होते. यावेळी खासदार नितीन काका पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, जावळी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे , संचालक अजित कळंबे, प्रवीण शेठ भिलारे, सहकार बोर्डाचे अध्यक्ष महादेव दुधाने, राजेंद्र भिलारे, अशोक दुधाने, रमेश चोरमले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, संतोष कवी, विठ्ठल दुधाने, जनार्दन कळंबे, अंकुश मालुसरे तसेच गावोगावचे सरपंच , सदस्य व मतदार उपस्थित होते. 

भाऊ कदम पुढे म्हणाले मकरंद आबा पाटील आणि अजितदादा पवार यांच्यासारखी माणस शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करीत आहेत. सकाळी सहा वाजता उठतात ,रात्री दीड वाजता झोपतात आणि पुन्हा सकाळी सहा वाजता उठतात. सकाळी पुन्हा अगदी फ्रेश. ती स्वतःसाठी काही करत नाहीत तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी रात्रंदिवस झटत आहेत. खरंच ही मोठी माणस आहेत त्यांना तुम्ही पुन्हा विधानसभेत पाठवा. 

यावेळी बोलताना खासदार नितीन काका पाटील म्हणाले मकरंद आबा पाटील हे तुमच्या मनातले आमदार आहेत. त्यामुळे यावेळी जास्तीत जास्त मताधिक्य तुम्ही महाबळेश्वरकर नागरिक आबांना विजयी करतील याची मी खात्री बाळगतो. 

यावेळी राजेंद्र शेठ राजपुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक दुधाने यांनी आभार मानले. 

भाऊ कदम पांचगणी कर होणार…

 महाबळेश्वर तालुका हा सुजलाम सुफलाम आहे. मकरंद आबा हे तुमच्यावर खूप प्रेम करताहेत. हे तुमच्या उपस्थिती वरून दिसून येत आहे. महायुतीने अनेक योजना तळागाळात पोहोचवल्या आहेत. त्यातीलच घरकुल योजना आहे. अजित दादा मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला मी सांगतो मी ही या योजनेचा फायदा घेणार आहे. मी ही आता तुमचाच म्हणजेच पांचगणी कर होणार आहे. असे भाऊ कदम यांनी सांगितले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 7 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket