आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ साताऱ्यात रविवारी विराट सभेचे आयोजन
भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवार दि. १७ रोजी सायंकाळी ५ वाजता राजवाडा, गांधी मैदान येथे विराट सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे, या सांगता सभेला खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान, या सभेला मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींनी आणि जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
गांधी मैदान येथे होणाऱ्या विराट सांगता सभेच्या नियोजनार्थ सुरुची कार्यालय येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला लोकसभा संयोजक सुनील काटकर, विधानसभा संयोजक अविनाश कदम यांच्यासह सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, भाजप आणि महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, परळी, शेंद्रे, कोंडवे आणि लिंब जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेला खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, आरपीआयसह महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सातारा नगर पालिकेतील सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजपचे सर्व आजी- माजी पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, परळी, शेंद्रे, लिंब, कोंडवे जिल्हा परिषद गटातील सर्व आजी- माजी पदाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, अजिंक्य उद्योग समूहातील सर्व संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेला सातारा शहरासह मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनी तसेच दोन्ही राजेंवर प्रेम करणाऱ्या जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.