माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे
सातारा – माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा करण्यासाठी नोव्हेंबर 2026 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
संघटकाचा दौरा पुढीलप्रमाणे.17 नोव्हेंबर रोजी कराड तहसील कार्यालय, 20 नाव्हेंबर रोजी तहसील कार्यालय दहिवडी, 25 नोंव्हेंबर रोजी वाई तहसील कार्यालय, 27 नोव्हेंबी राजी फलटण तहसील कार्यालय व 30 नोव्हेंबर रोजी पाटण तहसील कार्यालय असा कल्याण संघटकांचा दौरा राहणार आहे.



