सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक बचत दिनानिमित्त आर्थिक साक्षरतेचा जागर साहित्य निर्मितीतून घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरतात- श्रीरंग काटेकर सातारा जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०४ महिने कालावधीकरिता केले हद्दपार
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात

किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात

किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात

वाई प्रतिनिधी -नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितिनकाका पाटील यांच्या नियोजनबद्ध व आर्थिक काटकसरीने चालवित असलेल्या किसन वीर व खंडाळा कारखान्यास तसेच ऊस उत्पादक सभासद, तोडणी वाहतुक यंत्रणा, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी येणारी दिवाळी ही सुख व समद्धी घेऊन ही दिवाळी येवो, अशी अपेक्षा उराशी बाळगुन कामगारांच्या साखर वाटपास व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली.

श्री. शिंदे म्हणाले की, अतिशय प्रतिकुल परिस्थितीतुन मार्गक्रमण करीत कारखान्याची यशस्वी वाटचाल आता खऱ्या अर्थाने चालू झाली आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या प्रत्येक घटकाचा आम्ही गांभिर्याने विचार करत आहोत. अनंत संकटे पायदळी तुडवीत नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या अथक परिश्रमातुन किसन वीर कारखान्यास गतवेभव प्राप्त करून देण्याचा मानस आहे. कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी व कामगार हे किसन परिवाराचे अविभाज्य घटक असुन त्यांची दिवाळी गोड करण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे.

मंगळवार (दि.३) रोजी जाहीर केल्याप्रमाणे कामगारांच्या खात्यावर त्यांचे दोन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आलेले असुन बुधवार (दि.४) रोजी कामगारांना ५ किलोप्रमाणे साखरेचे वाटपाची सुरूवात करण्यात आली. सभासद व बिगर सभासद यांच्यासाठी वेगळ्या ठिकाणी तसेच कामगारांसाठी साखर वाटपाचे नियोजन स्वतंत्रपणे करण्यात आलेले आहे. कामगारांनाही साखर वाटप करण्यात

आल्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार त्यांचे सर्व पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी, नितीन निकम, सागर भिंताडे, मधुकर खरे, सचिन इथापे, निलेश बाबर, कारखान्याचे कर्मचारी. महिला कर्मचारी उपस्थित होते.

किसन वीर’च्या व्यवस्थापनाच्या पाठीशी भक्कमपणे कामगार उभे राहणार-दत्तात्रय शेलार

मागील आठ ते दहा वर्षापासुन किसन वीर कारखाना अतिशय अडचणीत असल्याने शेतकरी व कामगारांना साखर मिळत नव्हती. परंतु कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयामुळे कारखान्याच्या प्रत्येक घटकाला दिवाळीचीनिमित साखर वाटप करण्यात आली. या निर्णयामुळे आम्हा कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण तर आहेच परंतु व्यवस्थापनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचा निर्धार कामगारांच्यावतीने युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक

सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक सातारा-येथील यशोदा शिक्षण

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

Live Cricket