माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील  सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा

डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा

डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा

सातारा : पेन्शनधारकांची सोय वाढविणे आणि डिजिटल सेवांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) भारत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाच्या (DoPPW) सहकार्याने १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) अभियान ३.० मध्ये सक्रिय सहभागी होत आहेत.

या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत IPPB च्या माध्यमातून कराड, पाटण, माण आणि खटाव तालुक्यातील पेन्शनधारकांसाठी आधार आधारित चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) आणि फिंगरप्रिंट बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) तयार करण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अभियानांतर्गत EPFO (EPS-95) पेन्शनधारक, दूरसंचार विभाग (DoT) पेन्शनधारक आणि संरक्षण विभाग (CGDA/DAD) पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची सुविधा पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आली आहे. तर इतर सर्व पात्र पेन्शनधारकांसाठी ही सेवा केवळ ₹७० (GST सह) या नाममात्र सेवा शुल्कात उपलब्ध करून दिली जात आहे.

ही सेवा देशभरातील डाकघरांमध्ये तसेच पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून थेट पेन्शनधारकांच्या घरी जाऊन दिली जाणार आहे. याशिवाय विविध ठिकाणी विशेष DLC शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता संबंधित पेन्शन वितरण कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची कोणतीही आवश्यकता उरलेली नाही.

हा उपक्रम विशेषतः ज्येष्ठ नागरिक, अतिज्येष्ठ नागरिक, शारीरिक हालचालींवर मर्यादा असलेल्या व्यक्ती तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि लाभदायक ठरणार आहे, असे कराड विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे सातारा – माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

Live Cricket