सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक
सातारा-येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी चि .रणवीर महेशकुमार सावंत* याने ठाणे येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे सातारा जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ठाणे येथे दिनांक ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ दरम्यान या शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अटीतटीच्या स्पर्धेत रणवीरने सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना आपल्या विलक्षण चपळतेचे व उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन घडवले. त्याने मल्लखांबावर अत्यंत अवघड प्रात्यक्षिके सादर करून पंचांची मने जिंकली आणि सर्वोच्च गुण मिळवत मानाचा पहिला क्रमांक आपल्या नावावर केला.
रणवीरच्या यशामागे क्रीडा मार्गदर्शक विश्वतेज मोहिते सर आणि क्रीडा शिक्षक ऋषिकेश फरांदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . रणवीरच्या या उज्ज्वल यशाबद्दल यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे सर, सचिव सौ. साधनाताई सगरे मॅडम, उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती ढवळीकर मॅडम तसेच समस्त शिक्षकवृंदाने त्याचे विशेष अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .



