माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील  सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील 

दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील 

ऑक्टोबर ते डिसेंबरच्या टंचाई निवारण आराखड्यातील कामांना २० नोव्हेंबरपूर्वी मंजुरी देण्याचाही दिल्या सूचना 

सातारा : यंदाच्या दुष्काळी संकटाचे संधीत रूपांतर करून जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाई कायमस्वरूपी संपविण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने व नियोजनबद्ध काम करावे. भविष्यात पुन्हा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यादृष्टीने दीर्घकालीन उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

टंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील आराखड्यात समाविष्ट कामांना २० नोव्हेंबरपूर्वी प्रशासकीय मंजुरी देऊन ती प्रत्यक्ष सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, संबंधित उपजिल्हाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाने अधिकाधिक क्षेत्रावर चारा पिकांची लागवड होईल, असे नियोजन करावे. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा तसेच आगामी काळात उपलब्ध होऊ शकणाऱ्या चाऱ्याचे अचूक सर्वेक्षण करून त्याची माहिती सादर करावी. चारा उत्पादन, साठवणूक आणि व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी चारा प्रशिक्षण अभियान राबवावे.

पूर्वेकडील तलाव क्षेत्रात गाळपेर क्षेत्राचा प्रभावी वापर करून चारा व इतर पिकांच्या उत्पादनासाठी प्रयत्न करावेत. उपलब्ध पाण्याचा विचार करूनच विकासकामांचे नियोजन करावे. पाणी उपलब्धतेनुसार रब्बी पिकांच्या सिंचनाचे नियोजन करणे आवश्यक असून, उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करण्यावर भर द्यावा.

शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी बँका आणि खासगी वित्तीय संस्थांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये. तसेच कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने कर्जवसुली करू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

दुष्काळ ही केवळ तात्पुरती समस्या न मानता भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने काम करण्याची संधी म्हणून सर्व विभागांनी पाहावे. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणीसाठे आणि शासकीय योजनांचा एकत्रित उपयोग करून जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासाठी ठोस कृती करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे सातारा – माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

Live Cricket