सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक बचत दिनानिमित्त आर्थिक साक्षरतेचा जागर साहित्य निर्मितीतून घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरतात- श्रीरंग काटेकर सातारा जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०४ महिने कालावधीकरिता केले हद्दपार
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

सातारा दि. 4- सातारा जिहयातील एकूण 51453 कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करणेत आली असून त्या पैकी 41526 पात्र शेतक-यांची यादी प्रसिध्द करणेत आलेली आहे. त्या पैकी 36431 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) पुर्ण केलेली आहे. आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांपैकी आज रोजी पर्यंत 34581 शेतकऱ्यांना रु.252.88 कोटी इतक्या रक्कमेचा लाभ प्राप्त झालेला आहे.

यापुर्वी प्रसिद्ध झालेल्या तीन्ही याद्यांमध्ये मिळून सातारा जिल्हयातील 29705 लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम रुपये 219.90 कोटी रुपये एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे. आज दि.4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीमध्ये आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी 4876 शेतकऱ्यांना 32.98 कोटी रुपये रक्कमेचा लाभ देण्यात आलेला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.सातारा यांचे 3783 शेतकऱ्यांना रक्कम रुपये 22 कोटी व राष्ट्रीयकृत व इतर व्यापारी बॅंकांना मिळून 1093 शेतकऱ्यांना 10.98 कोटी रुपये रक्कमेचा लाभ देण्यात आलेला आहे.  

आज रोजीपर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.सातारा बॅंकेतील 29601 शेतकऱ्यांना रक्कम रुपये 205.72 कोटी एवढ्या रक्कमेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या 4980 शेतकऱ्यांना 47.16 कोटी रुपये असे एकूण सातारा जिल्हयातील 34581 शेतकऱ्यांना 252.88 कोटी रुपयांचा लाभ प्राप्त झालेला आहे.

त्यामुळे सातारा जिल्हयातील 34581 शेतकरी कर्ज मुक्त होवून पिक कर्ज घेणेस पात्र झाले आहेत. सदर योजने नुसार कर्ज मुक्तीचा लाभ मिळणेसाठी आधार प्रमाणिकरण (ई केवायसी ) करणे आवश्यक आहे. तसेच शेतक-यांकडे शेतकरी ओळख क्रमांक (ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी ) असणे आवश्यक असून ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक काढलेला नाही. त्यांनी तो नोंदणी करुन काढणेत यावा. व आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.

प्रसिध्द झालेल्या यादीतील सुमारे 5095 शेतकऱ्यांनी अदयाप ही त्यांचे आधार प्रमाणिकरण केलेले नाही. व 2819 शेतकऱ्यांचे फार्मर आय डी नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा श्री.संजयकुमार सुद्रिक यांनी अशा शेतकऱ्यांना त्यांचे फार्मर आयडी काढून घ्यावेत व आपले आधार प्रमाणिकरण पुर्ण करावे. म्हणजे सदर कर्ज मुक्ती योजनेचा लाभ त्यांना तातडीने मिळणेस सुलभ होईल असे आवाहन केलेले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक

सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक सातारा-येथील यशोदा शिक्षण

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

Live Cricket