नेपाळच्या महापुरात १६२ जणांचा मृत्यू, ३०० भारतीय बेपत्ता
नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुरामुळे आलेल्या महाप्रलयानं मानवी प्रयत्नांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. हिमस्खलनामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. मात्र, या पुरामुळे काही क्षणांत मोठ्या वेगानं आणि मोठ्या प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे गावंच्या गावं वाहून नेल्याची भयानक दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागली आहेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या दृश्यांमध्ये निसर्गाचा कोप आणि जगण्यासाठीची माणसाची धडपड अशा दोन्ही बाबी प्रकर्षानं जाणवत असल्याचं दिसून येत आहे. नेपाळमधील या पूरस्थितीत जवळपास ३०० भारतीय बेपत्ता आहेत . आत्तापर्यंत या पुरात १६२ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
काही वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीची आठवण करुन देणारा महाप्रलय नेपाळमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. चीनच्या तिबेटमधून आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात हाहा:कार माजला आहे.





