जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेलं युवा नेतृत्व – विराजभैय्या शिंदे”
समाजकारणाच्या माध्यमातून बदल घडवण्याची जिद्द मनात बाळगून राजकारणात पाऊल टाकणारे युवा नेते विराजभैय्या शिंदे हे सध्या वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एक प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत. कै.अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटात, तसेच मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय वाटचालीला नवे बळ दिले आहे.
वाई तालुक्यातील ग्रामीण भागात विराज शिंदे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. बावधन जिल्हा परिषद गटातून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आपल्या पत्नी ऋतुजाताई शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून आणत, आपल्या संघटन कौशल्याची आणि नेतृत्व क्षमतेची ताकद जिल्ह्याला दाखवून दिली. ही विजयगाथा त्यांच्या प्रभावी जनसंपर्काची आणि लोकांमध्ये असलेल्या विश्वासाची साक्ष देते.
कोविडसारख्या कठीण काळात असो किंवा वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती—प्रत्येक वेळी मदतीसाठी धावून जाणारे, लोकांच्या अडचणींना स्वतःच्या जबाबदारीप्रमाणे हाताळणारे असे युवा नेतृत्व म्हणून विराज शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्यपद्धतीत दिसणारा आक्रमकपणा आणि निर्णयक्षमता हे त्यांचे वेगळेपण अधोरेखित करतात.
विकासकामांबाबत अत्यंत आग्रही, आशावादी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले विराज भैया शिंदे हे खऱ्या अर्थाने नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या नेतृत्वात भविष्यात या भागात विकासाची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. आज त्यांचा वाढदिवस.अशा या तरुण, जिद्दी आणि कर्तृत्ववान नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक आणि अनंत शुभेच्छा!
पत्रकार अली मुजावर




